हॅलो कृषी ऑनलाईन (Mango Rate) ।उन्हाळा आला कि अनेकांना कधी एकदा आंब्याची चव चाखतोय असे होते. फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याला नेहमीच मोठी मागणी असते. परंतु चांगल्या प्रतीचा आंबा मिळण्यास अडचण येते. काहींची बाजारात देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूस देऊन फसवणूक केली जाते. आज आम्ही तुम्हाला आजचे आंबा बाजारभाव सांगणार आहोत. तसेच सर्वात स्वस्त अन विश्वासू हापूस आंबा शेतकऱ्यांकडून विकत घेण्यासाठी काय करावं याबाबत माहिती सांगणार आहोत.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हापसू आंबा स्वस्तात कुठे मिळेल?
तुम्हाला जर चांगल्या दर्जाचा क्वालिटी देवगड हापूस आंबा योग्य दरात घ्यायचे असेल तर आता तुम्ही थेट कोकणातून शेतकरी ते ग्राहक अशी खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. इथे शेतकरी दुकान या विभागातील शेतमाल या भागात तुम्हाला थेट शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करण्याची सुविधा आहे. अनेक शेतकरी पुणे, मुंबई अशा शहरांतही आंबे पोहोच करत आहेत. यासोबत तुम्ही हॅलो कृषी अँप वरून घरी लागणार इंद्रायणी तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, खपली गहू असे पदार्थ देखील कमी किमतीत विकत घेऊ शकता.
आज मुंबई फ्रुट मार्केटमध्ये हापूस आंब्याची 6047 क्विंटल इतकी आवक झाली. यावेळी कमीत कमी ११ हजार रुपये तर जास्तीत जास्त ३० हजार रुपये दर (Mango Rate) प्रतिक्विंटल मागे मिळाला. तसेच लोकल आंब्याची 7855 क्विंटल आवक मुंबई फ्रुट मार्केटला जाहली असून कमीत कमाई ५ हजार तर जास्तीत जास्त ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. प्रत्यक्ष बाजारात चांगल्या क्वालिटीचा हापूस आंबा ७०० रुपये ते ९०० रुपये प्रति डझन या भावाने विकला जातो आहे.
शेतमाल : आंबा (Mango Rate)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
13/04/2023 | ||||||
छत्रपती संभाजीनगर | — | क्विंटल | 11 | 6000 | 10000 | 8000 |
नाशिक | हापूस | क्विंटल | 170 | 21000 | 30000 | 25000 |
मुंबई – फ्रुट मार्केट | हापूस | क्विंटल | 6047 | 11000 | 30000 | 20500 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | लोकल | क्विंटल | 138 | 2500 | 3000 | 2750 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 99 | 6000 | 10000 | 8000 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 687 | 3500 | 4200 | 4025 |
मुंबई – फ्रुट मार्केट | लोकल | क्विंटल | 7855 | 5000 | 8000 | 6500 |
कामठी | लोकल | क्विंटल | 5 | 2500 | 3500 | 3000 |
हिंगणा | लोकल | क्विंटल | 3 | 3000 | 3000 | 3000 |
जळगाव | मद्रास | क्विंटल | 12 | 6000 | 6000 | 6000 |
सोलापूर | नं. १ | नग | 58 | 1200 | 2000 | 1600 |
सोलापूर | नं. १ | क्विंटल | 62 | 2000 | 10000 | 5800 |