मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस, कोकणातही हलक्या सरींचा हवामान खात्याचा अंदाज

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्यामार्फत व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या काही भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. येत्या 3 ते चार दिवसात अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

पुढील चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा असेल असाच अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवाय काही भागात गारपीटीची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल तर काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळतील. सहा मे नंतर काही भागात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीच्या भागातही पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात हा पाऊस होईल असा अंदाज आहे. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. दुपारनंतर मेघ दाटून येतील आणि संध्याकाळनंतर या पावसाला सुरुवात होईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. हवामानाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी काढलेले पीक व्यवस्थित ठेवावं. अशी सूचना देखील हवामान खात्याच्या विभागाकडून देण्यात आली आहे