Milk Fever In Cattle: दुधाळ जनावरातील दुग्धज्वर आजार; जाणून घ्या प्रतिबंधक आणि नियंत्रण उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जनावरात आढळणाऱ्या महत्वाच्या आजारांपैकी दुग्धज्वर (Milk Fever In Cattle) हा प्रामुख्याने दूध देणाऱ्या संकरीत गायी, म्हशींमध्ये आढळतो. रक्तातील कमी कॅल्शियम पातळीमुळे (Low Calcium Level) हा रोग उद्भवतो, या आजारात प्रत्यक्षात ताप येत नसला तरी बद्धकोष्ठता होणे, पोट सरकणे, जार अडकणे, गर्भाशय विकार, गर्भाशयस्नायू दाह आणि किटन बाधा यासारखा त्रास होतो. जाणून घेऊ या आजाराची (Animal Diseases) कारणे, लक्षणे आणि उपचार.  

आजाराची कारणे (Causes Of Milk Fever)

हा आजार (Milk Fever In Cattle) व्यायल्यानंतर सामान्यतः 72 तासांच्या आत उद्भवतो. पहिल्या 48 तासात वासरांनी पूर्ण दूध पिण्यामुळे जनावरांना दुग्ध्ज्वर होऊ शकतो. तसेच रक्तातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तसेच आहारात ऑक्झेलेट आणि मॅग्रेशियमचे प्रमाण अधिक असणे यामुळे सुद्धा हा रोग होतो. प्रसुती दरम्यान जनावरांच्या मुत्राचे पीएच 6.5-7 च्या दरम्यान असावे. जास्त पीएच असल्यास दुग्धज्वराचा धोका संभवतो.

दुग्धज्वर आजाराची लक्षणे (Symptoms Of Milk Fever In Cattle)

  • आजाराच्या (Milk Fever In Cattle) सुरुवातीच्या टप्प्यात जनावरांचे पार्श्वभाग आणि कंबर थरथरण, कान पिळणे आणि डोके फुगवणे यासारखी लक्षणे दिसतात.
  • जनावर सुस्त होते, डोके हलविणे , सतत जीभ बाहेर काढणे , दात खाणे , अडखळत चालणे अशी लक्षणे दिसू लागतात.पहिल्या 48 तासात वासरांनी पूर्ण दूध पिण्यामुळे जनावरांना दुग्ध्ज्वर होऊ शकतो.
  • जनावरे उभे राहू शकत नाही आणि नंतरच्या अवस्थेत तो आडवे होतात. जनावरांची मान एका बाजूला वळते.
  • शरीर थंड पडते, श्वासोच्छवास व नाडीचे ठोके जलद होतात, नाकपुड्या कोरड्या पडतात. शेण टाकणे व लघवी करणे बंद होते.
  • दूध देणे बंद होते, रवंथ करणे थांबून पोट फुगते. आवाज दिल्यास किंवा उठविण्याचा प्रयत्न करूनही जनावर उभे राहत नाही.
  • शेवटच्या टप्प्यात सामान्य तापमानात सुद्धा जनावरे बेशुद्ध होतात.

दुग्धज्वर प्रतिबंधक उपाय आणि उपचार (Prevention And Treatment Of Milk fever)

  • विण्यापूर्वी जनावरास योग्य आहार द्यावा. गाभण काळात खूप जास्त प्रमाणात खुराक देऊ नये, तसेच उपासमारही होता कामा नये.
  • उशीरा गर्भधारणा झालेल्या जनावरांना जास्त प्रमाणात कॅल्शियम पूरक आहार देऊ नये.  
  • जनावरास साळीचे तण, उसाचे वाढे जास्त प्रमाणात खाऊ घालू नये.
  • विण्यापूर्वी साधारण एक आठवडा जीवनसत्व ड’चे इंजेक्शन देणे फायदेशीर ठरते.
  • दुग्धज्वर आजाराची शक्यता असणार्‍या जनावरांना विण्याच्या 12-24 तासांपूर्वी आणि 48 तासानंतर तोंडावाटे कॅल्शियमचे 3-4 डोस दिल्यास 40-50 ग्रॅम कॅल्शियम त्यांच्या शरीरात गेल्याने दुग्धज्वर आजाराची शक्यता कमी होते.
  • अमोनियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम सल्फेट किंवा अमोनियम सल्फेट (दररोज 50-100 ग्रॅम) सारखे खनिज मिश्रण गाभण काळाच्या शेवटच्या 3 आठवड्यांत द्यावे.
  • या आजाराची (Milk Fever In Cattle) वरीलप्रमाणे लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब पशुवैद्यकाशी संपर्क साधा, प्राणी उपचारांना त्वरित प्रतिसाद देतात. उपचार न केल्यास, प्राणी दगावतो.
  • काही प्राणी 24-48 तासांच्या आत पुन्हा पडू शकतात आणि त्यांना पुढील उपचारांची आवश्यकता असते.