Milk Loan: गोदरेज कॅपिटल राज्यातील दूध उत्पादकांना देणार कर्ज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: लहान दूध उत्पादक शेतकर्‍यांना कर्ज (Milk Loan) उपलब्ध करून देण्यासाठी गोदरेज कॅपिटलने ‘क्रीमलाईन डेअरी’ आणि ‘द्वारा ई’ डेअरीसोबत भागीदारी केली आहे. हे कर्ज महाराष्ट्रासह दक्षिणेकडील इतर राज्यातील दूध उत्पादकांसाठी (Milk Producer) उपलब्ध होणार आहे. जनावरांची खरेदी आणि देखभाल यासाठी हे कर्ज विनातारण दिले जाईल. कर्ज मंजूरी जलद होणार असून परतफेडीचा कालावधी दोन वर्षांचा असणार आहे. यामुळे दूध उत्पादकांना फायदा होईल आणि दूध उत्पादनात (Dairy Business) वाढ होईल असा दावा गोदरेजने केला आहे (Milk Loan).

गोदरेज कॅपिटल हे गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची आर्थिक सेवा शाखा आहे. क्रीमलाईन डेअरी हे गोदरेज अॅग्रोव्हेटची (Godrej Agrovet) उपकंपनी आहे, जी दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करते. द्वारा ई डेअरी हे एक फिनटेक कंपनी आहे जे दुग्धजन्य क्षेत्रातील व्यवसायांना वित्तीय सेवा (Milk Loan) प्रदान करते. हे कर्ज गोदरेज कॅपिटलच्या (Godrej Capital) दुग्धव्यवसाय विस्तार योजनांचा भाग आहे.

दूध उत्पादकांना काय फायदा होईल?

कर्जामुळे दूध उत्पादक (Farmer Loan) शेतकर्‍यांना नवीन जनावरे खरेदी करण्यास आणि त्यांची देखभाल करण्यास आर्थिक मदत होईल. यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. शेतकर्‍यांना त्यांचे व्यवसाय वाढवण्यासाठी आणि अधिक नफा कमावण्यासाठी सुद्धा मदत होईल.

कर्ज कसे मिळवायचे? (Milk Loan)

अधिक माहितीसाठी आणि कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, दूध उत्पादक शेतकरी गोदरेज कॅपिटलच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा त्यांच्या स्थानिक शाखेचा संपर्क साधू शकतात.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.