हॅलो कृषी ऑनलाईन : न्यू हॉलंड या आघाडीच्या ट्रॅक्टर निर्माता (Mini Tractor) कंपनीने अल्प-भूधारक आणि फळ बाग शेतकऱ्यांसाठी ‘न्यू हॉलंड सिंबा 20’ हा एक अप्रतिम ट्रॅक्टर डिझाइन केलेला आहे. फळबाग शेतकऱ्यांना आपल्या बागेमध्ये विविध मशागतीची कामे तसेच औषध फवारणीसाठी मिनी ट्रॅक्टरची आवश्यकता असते. त्यामुळे हा ट्रॅक्टर फळ बाग शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्हीही मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ‘न्यू हॉलंड’ कंपनीचा ‘सिंबा 20’ हा तुमच्यासाठी एक छोट्या बजेटमध्ये मस्त पर्याय ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, ‘न्यू हॉलंड सिंबा 20’ बद्दलची (Mini Tractor) सविस्तर माहिती…
सिंबा 20 ची इंजिन क्षमता (Mini Tractor New Holland Simba 20)
‘न्यू हॉलंड सिंबा 20’ हा ट्रॅक्टर 17 HP इंजिन क्षमतेसह येतो. तो प्रत्यक्ष शेतात काम करताना आणि फळबागेमध्ये काम करताना उत्तम मायलेज देतो. याशिवाय सिंबा 20 हा शक्तिशाली मिनी ट्रॅक्टरपैकी एक आहे. या ट्रॅक्टरची निर्मिती करताना कंपनीने प्रगत तंत्रज्ञानासह अफाट शक्ती प्रदान केली असून, या इंजिन क्षमतेच्या जोरावर तो शेतात प्रभावीपणे काम करू शकतो. हा ट्रॅक्टर सुपर पॉवरसह उपलब्ध असून, त्याच्या इंजिनची कार्यक्षमता ही जबरदस्त आहे. त्यामुळे तो अल्प-भूधारक शेतकऱ्यांच्या प्रथम पसंतीस पडतो.
‘न्यू हॉलंड सिंबा 20’ची वैशिष्ट्ये
- या मिनी ट्रॅक्टरला कंपनीने 9 Forward + 3 Reverse गिअर बॉक्सेस दिलेले आहेत.
- न्यू हॉलंड सिंबा 20 हा Oil Immersed Disc Brakes सह उत्पादित करण्यात आला आहे.
- या ट्रॅक्टरचे स्टीयरिंग अत्यंत स्मूथ असल्याने, चालकाला ते आरामदायी अनुभव प्रदान करते.
- शेतात दीर्घ काळ काम करायचे असल्यास, एक लिटर इंधन टाकीची क्षमता त्यास देण्यात आली आहे.
- न्यू हॉलंड सिंबा 20 हा 750 Kg मजबूत वजन उचलण्याची क्षमता ठेवतो.
- हा ट्रॅक्टर कंपनीने 2200 आरपीएमसह उपलब्ध केलेला आहे.
किती आहे किंमत?
‘न्यू हॉलंड सिंबा 20’ या ट्रॅक्टरची किंमत कंपनीने 3.42 Lakh लाखापासून ते 4.05 Lakh लाखापर्यंत निर्धारित केली आहे. कंपनीने ही शोरूम किंमत भारतीय शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट लक्षात घेऊन निर्धारित केली आहे. माफक किमतीत उपलब्ध असल्याने हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरला आहे.