हॅलो कृषी ऑनलाईन: मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये मॉन्सून (Monsoon Update) लांबणार आहे. ईशान्य भारतात आणि दक्षिण भारतात मॉन्सून दाखल झाला आहे. मात्र उत्तर भारतात उष्णतेची लाट (Heat Wave In North India) कायम आहे. राजधानी दिल्लीत तापमान (Delhi Temperature) पोहोचले 45 अंशावर पोहचले आहे.
मॉन्सून (Monsoon Update) यंदा राज्यात वेळेपूर्वी दाखल झाला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात मॉन्सून पोहचला आहे. परंतु अजून विदर्भात दाखल झालेला नाही. संपूर्ण राज्यात मॉन्सून कधी पोहचणार त्यासंदर्भात हवामान विभागाने अपडेट दिले आहे. राज्यात पुढील पाच दिवसांत मॉन्सून सर्वत्र दाखल होणार आहे, असे आयएमडीने (IMD Monsoon Forecast) म्हटले आहे.
मुंबईत आज पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारी हवेतील आर्द्रता 60 टक्कांपर्यंत वाढणार आहे, उद्या पावसाची (Monsoon Update) पुन्हा रिपरिप सुरू होणार आहे.
राज्यात पाच दिवसांत सर्वत्र मॉन्सून
राज्यात पुढील पाच दिवसांत मॉन्सून (Monsoon Update) महाराष्ट्र व्यापणार आहे, असा अंदाज मुंबई हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे महासागराचे तापमान आणखी कमी होऊन येत्या ऑगस्टमध्ये ‘ला निना’ (La Nina Effect) विकसित होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. ‘ला निना’ असताना देशात बहुतेक वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो, असे आकडेवारी सांगते. ‘ला निना’मुळे यंदा मॉन्सूनच्या उत्तरार्धात जास्त पावसाची शक्यता असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला आहे.
विदर्भात मॉन्सून दाखल होणार
येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मॉन्सून विदर्भात (Monsoon In Vidarbha) दाखल होणार आहे. सध्या मॉन्सून (Monsoon Update) अनुकूल हवामान नसल्याने कोकण वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. परंतु चार पाच दिवसांत सर्वत्र पाऊस परतणार आहे.
उत्तर भारतात मॉन्सून रेंगाळणार?
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये मॉन्सून लांबणार आहे. ईशान्य भारतात आणि दक्षिण भारतात मॉन्सून दाखल झाला असला तरी उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. राजधानी दिल्लीत तापमान पोहोचले 45 अंशावर पोहचले आहे. उत्तर भारतात पाऊस झाला नाही तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
यंदा मॉन्सून वेळेआधीच
यंदा मॉन्सून (Monsoon Update) अंदमान निकोबार मध्ये 19 मे रोजी व केरळमध्ये 30 मे रोजी दाखल झाला. 6 जून रोजी महाराष्ट्रातील कोकणात आला, व 8 जून रोजी पुणे जिल्ह्यात मॉन्सून आला. त्यानंतर मराठवाड्यात देखील मॉन्सून आला होता. 9 जून रोजी मुंबईसह, ठाणे या भागात मॉन्सून आला. यामुळे विदर्भात मॉन्सून लवकरच दाखल होण्याची अपेक्षा आहे.