Moong Rate: मूग आणि उडीदाच्या बाजारभावात वाढ; पेरा घटल्याने भविष्यात सुद्धा दरात असणार झळाळी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वाशिम जिल्ह्यासह (Washim District) राज्यात कडधान्याच्या (Moong Rate) पेरयात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. आता पावसाळ्यात कडधान्यांच्या मागणीत वाढ होत असताना मूग आणि उडदाचा (Moong & Udad) साठा मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे बाजार समित्यांत (Bajar Samiti) या शेतमालाचे दर गगनाला भिडले आहेत. परंतु, शेतकर्‍यांकडे हा शेतमाल फारसा शिल्लक नसल्याने दर वाढूनही बाजार समित्यांत या शेतमालाची आवक मात्र नगण्य आहे. शनिवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाला (Moong Rate) कमाल 7 हजार 800 रुपये, तर उडद डाळीला (Udid Rate) कमाल 9 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला होता.

यंदाही पेरा राहणार कमीच 
जिल्ह्यातील शेतकरी मूग (Moong Rate) आणि उडीद या पिकांच्या पेरणीबाबत उदासीन आहेत. या पिकांचा खर्च अधिक असताना वन्य प्राण्यांचा या पिकांमध्ये मोठा उपद्रव असतो. तसेच कमी कालावधीच्या पिकांना अवर्षण, अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदाही खरीप हंगामात (Kharif Season Pulses Sowing) या पिकांचा पेरा कमीच राहण्याची शक्यता आहे.

दर आणखी वाढण्याची शक्यता 
देशभरात गेल्या काही वर्षांत मूग आणि उडीद या कडधान्य पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनही (Moong And Urad Production) घटले आहे. त्यात गतवर्षी मॉन्सून उशिरा दाखल झाल्याने या पिकांचे क्षेत्र नावापुरतचे होते. परिणामी यंदा शेतमालाला मोठी मागणी असल्याने पुढील काळात मूग आणि उडीद या दोन्ही शेतमालाच्या दरात (Moong Rate) आणखी वाढ होण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

शनिवारी 22 जून रोजी मुगाचे बाजारभाव (Moong Rate)

बाजार समितीजात/प्रतआवककमीतकमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अमळनेरचमकी5720074007400
लोणारचमकी5600072806640
पातूरचमकी2715071507150
लातूरहिरवा11550074007300
येवलाहिरवा1550055005500
अकोलाहिरवा131686076457360
पुणेहिरवा449200101009650
मुर्तीजापूरहिरवा15685074007175
औराद शहाजानीहिरवा3650165016501
भंडाराहिरवा4660066006600
नागपूरलोकल25680070006950
अहमहपूरलोकल5680068006800
नादगाव खांडेश्वरलोकल1580066506225
अमरावतीमोगली6700075007250
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.