हॅलो कृषी ऑनलाईन: नुकतेच 17 ऑगस्टला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) अंतर्गत लाभ वितरणाचा पहिला टप्पा पार पडला. ई- केवायसी (Aadhaar Seeding) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा (Second Stage Benefit Distribution) 31 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांनी (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) त्यांचे बँक खात्याची आधार सिडींग करून ई – केवायसी (e-KYC) प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन शासन मार्फत केले आहे.
राज्यातील अनेक महिला लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून लाभ वितरणासाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यापैकी आधार सिडींग नसलेल्या लाभार्थ्यांना बँकेत/ पोस्टात जाऊन आधार सिडींग करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. तसेच नव्याने प्राप्त अर्जही विधानसभा क्षेत्रनिहाय समितीच्या अंतिम मंजूरीने शासनाकडे लवकरच पाठविण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील महिलांना प्रत्येकी 3 हजार रुपये लाभ वितरीत करण्यात आला आहे. आधार सिडींग करून ई – केवायसी पूर्ण नसल्याने ज्या महिलांच्या खात्यात रक्कम अद्याप पर्यंत जमा झाली नाही त्या लाभार्थी महिलांनी आधार सिडींग करून ई – केवायसी पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
आधार सिडींग करून ई केवायसी प्रलंबित असलेल्या महिलांना शासनातर्फे मोबाइल संदेश पाठविण्यात आला आहे, त्यांनी तातडीने आपले खाते आधार सिडींग करून ई – केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे. लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूर मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय डीबीटी (DBT) निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असे अदिती तटकरे यांनी सांगितले.
ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत.
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) नारीशक्ती अॅप (Nari Shakti App) मधून अर्ज दाखल करून घेतले होते. ज्या महिलांच्या खात्यात सरकारने पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती. मात्र, राज्य सरकारने बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) पैशांची कपात न करता ते महिलांना द्यावेत, असे आदेश दिले होते.