नाफेडचे कांदा खरेदी उद्दिष्ट पूर्ण; बदलणार कांदा बाजारातले चित्र, काय होईल परिणाम ?

onion
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या विविध बाजार समित्यांमध्ये मागच्या काही दिवसांपासून नाफेड कडून कांदा खरेदी केला जात होता. मात्र आता नाफेडचे खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यामुळे आजपासून नाफेड कडून कांदा खरेदी बंद केली जाईल. याचा मोठा परिणाम मात्र कांदा बाजारावर आजपासून दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

नाफेडचे उद्दिष्ट पूर्ण

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाफेडचा चांगला आधार होता. शेतकऱ्यांच्या मालाला चांगली किंमत मिळत होती. यंदा अडीच लाख मेट्रिक टन कांद्याचे खरेदीचे उद्दिष्ट नाफेडने ठेवले होते. 16 एप्रिल पासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात येथील काही बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरू होती सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी 1 हजार 200 तर कमाल 1 हजार 436 रुपये दर मिळला आहे. मात्र आता नाफेडचे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर आज सोमवारपासून बाजारात काय चित्र असेल हे पाहावे लागेल.

चाळीतला कांदा सडला

राज्यात अनेक शेतकरी कांदा चाळीमध्ये साठवतात. मात्र मागच्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यामुळे नाशिकसह अनेक भागात चाळीतला कांदा देखील सडला आहे. त्यामुळे एकीकडे आपटलेले दर आणि चाळीत साठवलेल्या कांद्याचेही नुकसान यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे.