हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेईना. मागील आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. यामुळे जिल्ह्यात द्राक्ष पिकांचे अधिकाधिक नुकसान झाल्याचे पाहायला मिळते. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी, कुरनोली, खेडगाव, खडकसुकेणे, जोपूळ या ठिकाणी द्राक्षाचे अधिक पीक घेतलं जातं. मात्र याच भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन द्राक्ष पीक उध्वस्त झालंय. दुसरीकडे मात्र मोहाडी गावचेच प्रगतशील शेतकरी सुरेश कळमकर यांच्या द्राक्षांचे गारपीट आणि वादळामुळे कुठलेही नुकसान झालेले नसून द्राक्ष पूर्णतः सुरक्षित राहिले आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सुरेश कळमकर यांनी द्राक्षावर उन्हापासून बचाव व्हावा यासाठी क्रॉप कव्हरचा (Crop Cover) वापर केला. यामुळे कळमकर यांच्या द्राक्षाचे पीक अवकाळी पावसापासून बचावले. गारपीट ही क्रॉपवर पडल्याने ती गळून पडली. यामुळे कोणताही प्रादुर्भाव द्रक्षावर झाला नाही. असे क्रॉप शेतकऱ्यांना सरकारने द्यावे यामुळे पिकांचे नुकसान होणार नाही. यामुळे आता याची दखल राज्यमंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात जाऊन या प्रयोगाची पाहणी केली. तसेच या प्रगोगाचे कौतुक केले. तसेच हा प्रयोग आता आपण ट्रायल बेसेसवर करुयात. तसेच जे मॉडेल अंमलात येईल त्यापद्धतीचे मॉडेल उभे करुयात अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
द्राक्ष कव्हरची मागणी ही पूर्वीपासून पहायला मिळते. ही मागणी द्राक्ष संघटनेकडून होत आहे. कृषी विद्यापीठाने देखील या कव्हरला फायदेशीर आणि उपयोगी असल्याचे घोषित केले आहे. मात्र अजूनही याबाबत अजूनही सरकारने कोणतंही पाऊल उचलले नाही. यावर आता सरकारकडून कशा पद्धतीने दिलासा दिला जाईल, याकडे लक्ष लागले आहे.