हॅलो कृषी ऑनलाईन: कापूस (New Cotton Variety) हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे खरीप नगदी पीक (Kharif Cash Crop) आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश भागात कापसाची सर्वाधिक लागवड (Cotton Cultivation) केली जाते.
कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी वेगवेगळे संशोधन विद्यापीठ आणि संशोधन केंद्रात केले जाते. यामध्ये कापसाचे वेगवेगळे वाण (New Cotton Variety) सुद्धा विकसित केले जाते. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला (Dr. PDKV Akola) येथील शास्त्रज्ञांनी कापसाचे एक नवीन वाण (New Cotton Variety) विकसित केले आहे.
‘पीडीकेव्ही धवल’ (PDKV Dhawal) असे या नवीन देशी सुधारित वाणाचे (Desi Improved Cotton Variety) नाव आहे. या वाणाचे प्रसारण नुकत्याच दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. खरे तर हा वाण (New Cotton Variety) 2022 मध्ये कापूस संशोधन विभागाच्या शास्त्रज्ञांकडून कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रसारित करण्यात आला होता.
मात्र, आता हा वाण पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते राष्ट्रीय पातळीवर अधिसूचित करण्यात आला आहे. यामुळे बियाणे प्रसाराचे काम युद्धपातळीवर होणार आहे. याचा महाराष्ट्रासहित इतर कापूस उत्पादक राज्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होणार आहे.
‘पीडीकेव्ही धवल’ कापसाच्या वाणाची वैशिष्ट्ये
- हा वाण (New Cotton Variety) कोरडवाहू क्षेत्रासाठी (Rainfed Area Cotton Variety) शिफारशीत करण्यात आला आहे. यापासून कमी पाण्यात चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येणे शक्य आहे.
- दुष्काळ किंवा कमी पाण्याच्या परिस्थितीत ही जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
- कोरडवाहू भागात लागवड केली तरी हेक्टरी 15 ते 16 क्विंटल पर्यंतचे उत्पादन सहजतेने मिळवले जाऊ शकते.
- हा वाण महाराष्ट्रा व्यतिरिक्त मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात देखील कोरडवाहू भागासाठी शिफारशीत करण्यात आला आहे.
- रस शोषक किडींना देखील हा वाण प्रतिकारक (Sucking Pest Resistant Cotton Variety) असल्याचे आढळले आहे.
- ही एक मध्यम लांबीची कापसाची जात (New Cotton Variety) असून धाग्याची लांबी ही 25 मिलिमीटर एवढी आहे.