हॅलो कृषी ऑनलाईन: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विविध पिकांचे (New Crop Variety) सहा नवे पीक वाण विकसित केले असून, यात हेक्टरी 20.76 क्विंटल उत्पादन देणाऱ्या ‘सुपर जॅकी हरभरा’ (Super Jackie Harbhara) वाणाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पिकाची यंत्राने काढणी करता येणार आहे. या वाणाला पेरणीसाठीची (New Crop Variety) मंजूरी मिळाली आहे.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या ‘ज्वॉइंट अॅग्रोस्को’ (Joint Agresco) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (Dr. PDKV Akola) पार पडला. यामध्ये चारही कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या 20 नवीन वाणांना (New Crop Variety) यामध्ये मंजूरी देण्यात आली आहे. यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सहा नवीन वाणांचा समावेश आहे.
हरभरा (Gram Crop) हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून, राज्यात या पिकाचे क्षेत्र जवळपास 25 लाख हेक्टर पर्यंत वाढले आहे. परंतु अलीकडच्या काही वर्षात पावसाच्या अनियमितेसह मनुष्यबळाचा परिणाम या पिकाच्या पेरणीसह उत्पादनावर झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे हरभरा वाण (Gram New Variety) विकसित केले आहे.
इतर 6 वाण विकसित (New Crop Variety)
याच सोबत धानाचे साक्षी, मोहरीचे एसीएन-237, करडईचे एकेस 351, कुटकी यासह ग्लॅडिओलस हे फुलाचे नवे वाण विकसित केले आहे. या सर्व वाणांना ज्वॉइंट अॅग्रोस्कोमध्ये मंजूरी प्राप्त झाली असून, पेरणीसाठी प्रसारित करण्यात आले आहे.
नवीन हरभऱ्याचे हेक्टरी 20.76 क्विंटल उत्पादन
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे हे वाण 95 दिवसात येणारे असून, उत्पादन हेक्टरी 20.76 क्विंटल एवढे आहे. विशेष म्हणजे यंत्राने तर काढता (Machine Harvesting) येणारच आहे. ही जात पिकावर येणार्या मर व करपा रोगास प्रतिबंधक आहे.