हॅलो कृषी ऑनलाईन: कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने भाताची तीन नवी वाण (New Rice Variety) विकसित केली आहेत. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या (Dr. BSKKV Dapoli) अंतर्गत येणाऱ्या या कृषी संशोधन केंद्राने ‘कोकण संजय’, ‘कर्जत 10’ आणि ‘ट्रॉम्बे कोकण खारा’ हे तीन नवे वाण (New Rice Variety) विकसित केले आहे. महत्वाची बाब म्हणजे केंद्रीय वाण प्रसारण समितीने या तिन्ही वाणांना मान्यता दिली असून पुढील हंगामापासून ही तिनही वाण शेतकऱ्यांना (Farmers) वितरीत करण्यात येणार आहेत.
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत (Regional Agricultural Research Centre Karjat) येथील भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांच्या पथका मार्फत ही तीन वाण विकसित (New Rice Variety) करण्यात आली आहेत. विविध कालावधीच्या वैशिष्ट्यपूर्ण वाणांना राज्यस्तरीय वाण प्रसारण समितीने यापुर्वीच मान्यता दिली होती. आज केंद्रीय वाण प्रसारण समितीनेही या तिन्ही वाणांना अधिघोषित केले आहे.
नवीन वाणांची वैशिष्ट्ये (New Rice Variety Features)
कोकण संजय (Konkan Sanjay): हे वाण निमगरवा प्रकारातील असून, लागवडीपासून 125 ते 130 दिवसात पीक कापणीसाठी तयार होते. हे वाण लांबट आणि बारीक दाण्याचे असून, यातून प्रती हेक्टरी 50 ते 55 क्विंटल उत्पादन मिळू शकणार आहे. कीड आणि रोगास हे वाण मध्यम प्रतिकारक असणार आहे.
कर्जत-10 (Karjat-10) : हे वाण गरवा प्रकारातील आहे. ज्याची लागवड केल्या पासून साधारणपणे 140 ते 145 दिवसात उत्पादन मिळू शकणार आहे. या वाणाची उत्पादकता हेक्टरी 45 ते 55 क्विंटल आहे. हे वाण पाणथळ जमिनीसाठी उपयुक्त असणार आहे. प्रमुख कीड व रोगास मध्यम प्रतिकारक असणार आहे.
ट्रॉम्बे कोकण खारा (Trombay Konkan Khara): हे वाण निमगरवा प्रकारातील आहे. लागवडीपासून साधारणपणे 125 ते 130 दिवसांनी याचे उत्पादन मिळणार आहे. हे वाण लांबट बारीक दाण्याच्या प्रकारातील असून, हेक्टरी 40 ते 45 क्विंटल उत्पादन मिळणार आहे. कोकण विभागातील क्षारपड जमिनीसाठी हे वाण उपयुक्त असणार आहे. 6 ईसी पर्यंत क्षार सहन करणारा क्षमता या वाणात असणार आहे.