Bullock Cart Race: ‘हा’ नियम पाळला तरच मिळेल बैलगाडी शर्यतीसाठी परवानगी! अन्यथा या सुविधांपासून राहाल वंचित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्राची परंपरा बैलगाडी शर्यतीची (Bullock Cart Race) सर्वांना खूप उत्सुकता असते. ग्रामीण भागात बैलगाडी शर्यतीचे वेड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पण आता बैलगाडी शर्यत जर आयोजित करायची असेल तर तुम्हाला या खास नियमाची अंमल बजावणी करावी लागेल. जाणून घेऊ या सविस्तर माहिती (Bullock Cart Race) .

एअर टॅगिंग (Ear Tagging) न केलेले बैल शर्यतीत (Bullock Cart Race) धावले तर संबंधित आयोजक, मालक यांच्यावर कारवाई होईल. टॅगिंग नसलेल्या कोणत्याही पशुंसाठी शासकिय दाखले दिले जाणार नाही. पशुधनाची (Animal Information) सर्वकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होऊन पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच पशू व पशुजन्य उत्पादन वाढीसाठी राज्यातील सर्व पशुधनाचे एअर टॅगिंग (Animal Ear Tagging) करण्यात येत आहे.

प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 व शासन निर्णयाची प्रभावी अंमल बजावणी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुधनास एअर टॅगिंग बंधनकारक केले आहे. त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करावी (Bullock Cart Race) .

सांगली जिल्ह्यातील (Sangali District) सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महापालिका प्रशासनाने येत्या 1 जूननंतर एअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशु वैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून कोणतीही पशु वैद्यकीय सेवा देऊ नये. त्यांच्या अधिनस्त असलेल्या कत्तल खान्यामध्ये टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये. टॅगिंग नसलेल्या कोणत्याही पशूसाठी शासकिय दाखले दिले जाणार नाही.

वाहतुकीला बंदी, दंडात्मक कारवाई
• कोणत्याही पशुधनाची वाहतूक (Bullock Cart Race) एअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. अशी वाहतूक करणाऱ्या पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
• बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा गावातील खरेदी-विक्री बाजारात एअर टॅग नसलेल्या पशुधनास प्रवेश देण्यात येऊ नयेच त्यांची खरेदी-विक्रीदेखील होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.

प्रशासनावर जबाबदारी
सांगली जिल्ह्यातील पोलीस विभाग, वन विभाग, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी एअर टॅगिंगची काटेकोर अंमल बजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी (District Collector) डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.

नुकसान भरपाई मिळणार नाही
नैसर्गिक आपत्ती, वि‍जेचा धक्का तसेच वन्य पशूच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास एअर टॅगिंग नसल्यास अशा पशु पालकांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार नाही. याबाबत सर्व महसूल, वन, वीज व महा वितरण विभाग यांना जिल्हाधिकारी यांच्याकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एअर टॅगचा क्रमांक नमूद (Ear Tag Number)
ग्रामपंचायतीमध्ये पशूच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची एअर टॅगिंगची खात्री केली जाईल. दाखल्यावर एअर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या सूचना
• सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, महसूल व गृह विभाग प्रशासनाने एअर टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये.
• पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबंधित पशु वैद्यकीय अधिकार्‍यांकडून अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशु पालकाची राहील.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.