Sugarcane: नेवासा तालुक्यातील उसाला रसवंतीसाठी आहे परराज्यातही मागणी; मिळतो 3500 रुपये प्रतिटन भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: अहमदनगरच्या (Ahmednagar) नेवासा तालुक्यातील उसाला (Sugarcane) रसवंतीसाठी (Sugarcane Juice) परराज्यातूनही मागणी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे त्या उसाला भावही 3500 रुपये प्रतिटन मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना साखर कारखान्यांऐवजी (Newasa Sugar Factory) रसवंतीला ऊस देणे परवडत आहे. दिवसभरात जवळपास दिडशे टन ऊस (Sugarcane) रसवंतीला लागत असून शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होत आहे. 

महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी उत्तर भारतात अद्यापही उन्हाचा (Heat Wave In North India) चटका कायम आहे. त्यामुळे दुपारी शहरी भागासोबतच ग्रामीण, निमशहरी भागात उसाचा रस पिणे नागरिक पसंत करत आहेत. त्यामुळे रसवंतीसाठी उसाला चांगली मागणी आहे (Sugarcane Demand In Other State). महाराष्ट्रासह हरयाणा, पंजाब (Punjab), राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथून रसवंतीसाठी नेवासा तालुक्यातील उसाला (Sugarcane) पसंती मिळत आहे.

12 ते 15 उसाची मोळी 
आपल्या राज्यातही विविध ठिकाणी नेवासा तालुक्यातील उसाला (Sugarcane) वाड्यासह रसवंती, जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी असते (Sugarcane Uses). अशा उसाला 2500 ते 2800 प्रतिटन भाव मिळतो. परराज्यात जाणाऱ्या उसाला 3500 रुपये प्रतिटन भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. परराज्यात जाणाऱ्या उसाची तोडणी करताना वाढे छाटले जातात. सरळ असलेल्या 12 ते 15 उसाची मोळी सुतळीने बांधतात.

दररोज दिडशे टन ऊस रसवंतीला 
एका ट्रकमध्ये 20 टन ऊस वाहतूकदार नेतात. त्याचे भाडे 35 ते 45 हजार रुपये होते. 20 टन उसाचे ट्रकसाठी राजस्थान, दिल्ली, पंजाब या राज्यासाठी आहे. ऊस तोडणी कामगारांना 500 रुपये प्रतिटन पैसे व चाऱ्यासाठी वाढे मिळतात. सध्या तालुक्यातून दररोज 100 ते 150 टन ऊस रसवंतीसाठी एजंटमार्फत पाठविला जातो. येत्या हंगामात उसाची टंचाई निर्माण होऊन भाव वाढण्याची शक्यता आहे.

शहरात बाराही महिने रसवंतीगृह

राजमार्गाच्या दुतर्फा, शहरात बसस्थानक वर्दळीच्या ठिकाणी रसवंतीगृह थाटलेले आहेत. ग्रामीण, निमशहरी भागात फिरते रसवंतीगृह सुरू आहेत. नागरिकांकडून त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे ऊस पुरवठादार व्यावसायिकांचा व्यवसाय जोरात आहे. हा व्यवसाय हंगामी असला तरी मोठ्या शहरात बाराही महिने हा व्यवसाय चालतो. नेवासा तालुक्यातून दरवर्षी परराज्यात उसाचा पुरवठा होतो. त्यामुळे या भागातील मजूरांना ऊस तोडणीच्या कामातून चार महिने चांगला रोजगार मिळतो.