नॉट ऑन मार्ट तर्फे जोडले जाणार २० लाख शेतकरी 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । गेल्या काही वर्षांमध्ये मानवी जीवनशैलीत तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. त्याला कृषी क्षेत्र ही अपवाद नाही. सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन या शब्दाला एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे.  शिक्षण ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन मार्केट असे शब्द आता वापरात आले आहेत आणि या गोष्टीही वेगाने वाढत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये नॉट ऑन मॅप आणि कॅलिफोर्नियातील हॉस्पिटॅलिटी फर्म स्टायफ्लेक्सिने डिजिटल प्लेटफॉर्म नॉट ऑन मार्ट लॉंन्च केले आहे. या डिजिटल प्लेटफार्मच्या माध्यमातून देशातील २० लाख शेतकरी थेट ग्राहकांशी जोडले जाणार आहेत. 

नॉट ऑन मार्ट या माध्यमातून शेतकरी चांगल्या प्रतीचा माल थेट ग्राहकांना वाजवी किमतीत उपलब्ध करून देऊ शकतो. त्यायोगे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्याच्या कामात मदत होईल. नॉट ऑन मार्ट २०२२ च्या पहिल्या तिमाहीतील लक्ष प्राप्त करण्याच्या योजनेवर काम करत आहे. नॉट ऑन मॅपची सुरुवात २०१४ मध्ये झाली होती कंपनी पर्यटकांना ऑफ बीट लोकेशनवर घेऊन काम करते. त्याठिकाणी स्थानिक ग्रामस्थांच्या घरी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करून त्यामुळे पर्यटक आणि होस्ट कुटुंबीयांच्या संस्कृतीची देवाण-घेवाण होते.

सध्या नॉट ऑन मॅप हिमाचल प्रदेश, लडाख, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी ठिकाणी डिजिटल सेवा पुरवते. नॉट ऑन मॅप हे लघु उद्योगाच्या दिशेने उचललेले पाऊल आहे. या डिजिटल प्लेट फॉर्मचा उद्दिष्ट अगदी लहान आकाराचे व्यवसायांमध्ये समन्वय साधणे हे आहे.  नॉट ऑन मॅपचे संस्थापक संचालक कुमार अनुभव यांनी सांगितले की, आमचे संपूर्ण लक्ष देशातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि कारागीर यांची ओळख करण्यावर असणार आहे. कारण शहरी बाजारपेठपर्यंत पोहचून ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने उपलब्ध करून देण्यात त्यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते, असे कुमार अनुभव म्हणाले. सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील बरेचसे शेतकरी आणि कारागीर लोक मध्यस्थी आणि वितरकांवर अवलंबून असतात. पुढे ते म्हणाले की, आमचा हेतू आहे की पुरवठासाखळी यंत्रणा लहान करणे आणि त्यांना मध्यस्थांच्या जाळ्यापासून पासून मुक्त करून थेट ग्राहकांशी जोडणे हे प्रामुख्याने नॉट ऑन मॅपचे उद्दिष्ट आहे.