यशोगाथा : ‘हा’ तरुण शेतकरी नर्सरी व्यवसायातून वर्षाला कमवतोय 20 लाख रुपये

Nursery Business
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Plant Nursery Business : आता सुशिक्षित तरुण शेतीत व्यवसायात उतरले आहेत आणि त्यांना यशही (Success Story) मिळत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर बरबडे हा तरुण शेतकरी असून त्याने पदवीनंतर रोपवाटिका व्यवसाय सुरू केला आणि आज तो वर्षाला 20 लाख रुपयांचा नफा कमवत आहे. कृषी पदवीधर असलेले सिद्धेश्वर बरबडे हे रोपवाटिका चालवणारी त्यांच्या कुटुंबातील पहिली पिढी आहे. सिद्धेश्वर म्हणतात की, त्यांच्या व्यवसायातील 55% उत्पन्न किरकोळ रोपे विक्रीतून येतो आणि बाकीचे आमच्या लँडस्केप बागकाम या माध्यमातून उत्पन्न मिळते.

सिद्धेश्वर यांनी श्रीराम ग्रामीण संशोधन आणि विकास प्रतिष्ठान, वडाळा येथे आयोजित ॲग्री-क्लिनिक अँड ॲग्री-बिझनेस सेंटर (AC&ABC) योजनेअंतर्गत प्रशिक्षणात भाग घेतला. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वत: 70 हजार रुपये गुंतवून रोपवाटिका स्थापन केली. सुरुवातीला शोभेच्या झाडांची रोपे विकण्यावर त्यांचा भर होता. सोलापूर महामार्गावर त्यांची रोपवाटिका आहे. शेतकऱ्यांची फळ रोपांची मागणी पाहून त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला आणि सर्व प्रकारच्या रोपांची रोपवाटिका सुरू केली.

20 लाख रुपयांची उलाढाल

सिद्धेश्वर हे रोपवाटिका व्यवसायातून चांगली कमाई करत आहे. 70 हजार रुपयांपासून सुरू झालेल्या त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आता 20 लाखांहून अधिक झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 3000 हून अधिक शेतकऱ्यांना ते आपली सेवा देत आहेत. त्यांनी त्यांच्या फर्ममध्ये 6 जणांना नोकरीही दिली आहे.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.