शेतकऱ्याची कांदा साठवणुकीची अनोखी पद्धत एकदा पहाच! वर्षभर खराब होत नाही कांदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन : राज्यातील बहुतांश शेतकरी आपल्या शेतात कांद्याची लागवड करतात. चांगलं उतपादन देणारे पीक म्हणून कांदा पिकाकडे शेतकरी पाहतॊ. पण आपल्याकडे शेतकरी कांद्याचा दर कमी झाला की कांदा साठवणुकीला प्राधान्य देतो आणि दर वाढल्यानंतर पुन्हा कांदा विक्रीस काढला जातो. कांदा साठवणुकीसाठी प्रचलित असलेली आपल्याकडील पद्धत म्हणजे कांद्याची चाळ करून त्यामध्ये कांदा साठवणे. चाळीत ठेवल्यानंतर नेहमी त्याची देखरेख केली जात नसल्याने आणि चाळीची बांधणी शास्त्र पद्धतीने नसल्याने कांदा खराब होत असतो. म्हणजेच दोन्ही बाजूने शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सोसावे लागते. हरियाणा मधल्या एका शेतकऱ्याने यावर उत्तम तोडगा काढला आहे. या शेतकऱ्याने कांदा कसा साठवण कशी केली आहे याबाबत माहिती घेऊयात.

सुमेर सिंग असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सुमेर हे हरियाणातील भिवानीतील ढाणी माहूत येथे राहतात. ते गेल्या 22 वर्षांपासून शेती करतायेत. शेतकऱ्यांना परवडेल आणि कांदा जास्तीत जास्त महिने टिकेल असा मार्ग यांनी सांगितला आहे.

कांदा साठवण्यासाठी काय केलं?

सुमेर सिंग यांच्या शेतात शेड आहे. या शेडमध्ये त्यांनी कांदे कापडी दोरीने बांधून ठेवेलेत. सुमेर म्हणतात. “कांदे विक्रीसाठी पोत्यात एकावर एक असे भरले जातात. कांदे उष्ण असतात. त्यामुळे दाबामुळे कांदे खराब होतात. एखादा कांदा जरी खराब असला तरी इतर कांदेही खराब होतात. पण आमच्या साठवणूक पद्धतीमुळे कांदा खराब होण्याची शक्यताच कमी झाली आहे. तसेच जर एखादा कांदा खराब झाला असेल तर ते ही समजू शकेल”, असा विश्वास सुमेर सिंग यांनी व्यक्त केला आहे. सुमेर सिंग यांनी सेंद्रीय पद्धतीने कांद्यांचे उत्पादन घेतले आहे. काढणीनंतर सुमेर यांनी कांदे पातीसह एकत्र बांधले. त्यानंतर ते शेतातील शेडमध्ये दोरीने टांगून ठेवले, ज्याप्रमाणे बाजारात दुकानदार केळी लटकवून ठेवतात. या पद्धतीने कांदे लटकवल्याने ते सुरक्षित राहतात तसेच खराबही होत नाही. त्यामुळे कांदे जास्त काळ टिकतात.”सुमेर यांच्या या कांदा साठवणीच्या पद्धतीमुळे कांदे अधिक काळ टिकतात. त्यामुळे ते कोरडे होण्यास मदत होते. कांदे कोरडे होताच त्याचे बाहेरील पापुद्रे काढून टाका. त्यानंतर पुन्हा ते लटकवा. या प्रकारे कांदे जवळपास वर्षभर टिकवून ठेवू शकतो”, असा काही कृषी तज्ज्ञांचा दावा आहे.

सुमेर यांना या पद्धतीने कांदा साठवल्याने प्रति किलो मागे 10 रुपयांचा फायदा झाला आहे. सुमेर म्हणतात, “मी आतापर्यंत प्रति किलो 25 रुपये या दराने एकूण 25 क्विंटल कांदा विकला आहे. तोच कांदा आता मी 35 रुपये किलो या भावाने विकत आहे. कांद्याची लागवड करण्यासाठी मला 55 हजार रुपये खर्च झाला. कांदा विक्रीतून माझा उत्पादन खर्च निघाला आहे. आता मला फायदा होत आहे.

संदर्भ – दैनिक जागरण