Poultry Professional: ‘या’ मागणीसाठी राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी दिला उपोषणाचा इशारा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र राज्यातील पोल्ट्री व्यावसायिक (Poultry Professional) येत्या 3 जुलैपासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी लाक्षणिक उपोषण (Hunger Strike) करणार आहेत. हे उपोषण पुणे येथील राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त (Commissioner Of Animal Husbandry Maharashtra) यांच्या कार्यालयावर करण्यात येणार आहे, अशी माहिती मावळ तालुका पोल्ट्री संघटनेचे (Poultry Professional) अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी दिली.

राज्यातील सुमारे दहा लाख पोल्ट्री व्यावसायिक (Poultry Professional) या यांनी या उपोषणाला सक्रिय पाठिंबा दिले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यासाठी ते हे आंदोलन करत आहेत. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या कार्यालयावर हे उपोषण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर व सचिव विलास साळवी तसेच कार्याध्यक्ष शरद गोडांबे, नंदू चौधरी, सर्जेराव भोसले, एकनाथ गाडे, सुभाष केदारी यांनी हे नियोजन केलेले आहे.

राज्यातल्या बहुतेक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या उपोषणाला बसणार आहेत. मावळ तालुक्यातून या उपोषणासाठी गाडे यांच्यासह, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, सचिव प्रवीण शिंदे, महेश कुडले, उत्तम शिंदे, संभाजी शिंदे, विनायक बदले प्रयत्न करीत आहेत.

वीज बिल माफ करावे

पोल्ट्री योजना संघटनेच्या (Poultry Scheme Association) वतीने सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी (Poultry Farming) लागू केलेली गाइड लाइन महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी करावी. ग्रामपंचायतीने आकारलेली अवास्तव घरपट्टी रद्द करावी. वीज बिल माफ करावे, आदी मागण्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत, त्याची सोडवणूक होईपर्यंत हे उपोषण चालणार असल्याचे संघटनेने (Poultry Professional) सांगितले आहे.