Purple Potato Variety: तुम्ही कधी जांभळा बटाटा पाहलाय का? जाणून घ्या काय आहे यात खास!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आतापर्यंत साधा बटाटा किंवा रताळे खाल्लेले आहे परंतु कधी जांभळा (Purple Potato Variety) बटाटा बघितला नाही किंवा खालेला सुद्धा नाही. परंतु ICAR-सेंट्रल बटाटा संशोधन संस्थेने (CAR-Central Potato Research Institute) ‘कुफरी जामुनिया’ (Kufri Jamunia) ही जांभळ्या बटाट्याची (Purple Potato Variety) अद्भुत जात विकसित केलेली आहे.  

विशेषत: भारतीय हवामानासाठी विकसित केलेली जांभळ्या रंगाच्या बटाट्याची (Purple Potato Variety) ही पहिलीच जात आहे. कुफरी जामुनिया ही बटाट्याची जात अद्वितीय वैशिष्ट्यांसाठी आणि फायद्यांसाठी वेगळी ठरत आहे. भारतात उपलब्ध असलेल्या बटाट्याच्या जातींमध्ये (Potato Variety) ही मौल्यवान भर आहे.

कुफरी जामुनियाची प्रमुख वैशिष्ट्ये

मध्यम परिपक्वता: कुफरी जामुनिया ही एक मध्यम कालावधीत परिपक्व (Medium Maturing Potato) होणारी जात असून, लागवडीपासून काढणीपर्यंत सुमारे 90 दिवसांचा कालावधी लागतो. कमी कालावधीचे पीक फेरपालट (Crop Rotation) करू पाहणाऱ्या शेतकर्‍यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.  

बायोफोर्टिफाइड आणि उच्च-उत्पन्न देणारी जात: ही जात बायोफोर्टिफाइड (Biofortified Potato) आहे, म्हणजे त्यात वाढीव पोषक घटक आहेत. विशेषत: कुफरी जामुनियामध्ये अँथोसायनिन्सचे प्रमाण जास्त असते, जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आहेत. हे एक उच्च उत्पादन देणारे वाण (High Yielding Potato Variety) आहे, ज्याचे सरासरी उत्पादन 320-350 क्विंटल प्रति हेक्टर आहे.

दिसायला आकर्षक: कुफरी जमुनियाचे कंद गडद जांभळे आणि आकाराने आयताकृती असतात. जांभळ्या रंगामुळे हा बटाटा (Purple Potato Variety) दिसायला आकर्षक तर आहेच त्यातील समृद्ध अँथोसायनिन हे अँटिऑक्सिडंट्स सुद्धा दर्शविते.

साठवण क्षमता: कुफरी जामुनियाचा (Purple Potato Variety) एक उल्लेखनीय फायदा म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीत त्याची उत्कृष्ट साठवण क्षमता. या बटाट्याची गुणवत्ता राखून जास्त काळ साठवण (Potato Storage Capacity) करता येते.  ज्यामुळे ते घरगुती वापरासाठी आणि व्यावसायिक उत्पादनासाठी उपयुक्त आहे.

कोणत्या भागात लागवड करता येते?

भारतातील उत्तर, मध्य आणि पूर्व मैदानी भागात लागवडीसाठी (Potato Cultivation) कुफरी जामुनियाची शिफारस केली जाते. या प्रदेशांमध्ये त्याची अनुकूलता या भागातील शेतकर्‍यांसाठी या बटाट्याला एक बहुमुखी पर्याय बनवते.

‘कुफरी जामुनिया’ बटाटा संशोधनातील महत्त्वपूर्ण प्रगती आहे. या बटाट्याचा अनोखा जांभळा रंग (Purple Potato Variety), बायोफोर्टिफाइड पौष्टिक फायदे, उच्च उत्पादन आणि चांगली साठवण क्षमता यामुळे शेतकरी आणि ग्राहकांसाठी ही एक उत्कृष्ट निवड आहे. ICAR-सेंट्रल बटाटा संशोधन संस्थेने विकसित केलेली ही जात भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये ठसा उमटवणार आहे.