Radhanagarai Dam : राधानगरी धरण ओव्हरफ्लो, धरणातून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग; पुराचा धोका वाढला

Radhanagarai Dam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Radhanagarai Dam : कोल्हापूर जिल्ह्यात सतत होणाऱ्या पावसामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन नद्यांना पूर आला आहे. गेल्या आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने राधानगरी हे धरण १०० टक्के भरले आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

आज सकाळी या धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजा उघडले असून आहे. त्यातून ५७१२ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणाच्या पीओटी पावर हाऊस मधून १४०० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. म्हणजेच एकूण ७११२ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

नदीकाठच्या गावांना स्थलांतर करण्याचे आदेश

त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ही पातळी धोका पातळी गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहून स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.