Rathi Cow Breed: चार गायींच्या संकरापासून निर्मित ‘ही’ आहे विशेष जात! जाणून घ्या, काय आहे खास?  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त दूध देणारी गाय (Rathi Cow Breed) महत्वाची असते. पण जर या गायीला खर्च कमी येत असेल तर अजूनच सोने पे सुहागा!

अशाच एका देशी गायीबद्दल (Desi Cow Breed) आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

या उपयुक्त गायीचे नाव आहे ‘राठी गाय (Rathi Cow). राठ समाजाने थारपारकर, लाल सिंधी तथा साहिवाल आणि धन्नी या भारतीय गोवंशाचे संकर करून ‘राठी’ या गोवंशाची (Rathi Cow Breed) निर्मिती केली.

राठ नावाच्या भटक्या मुस्लिम जमाती ने याचे मोठ्या प्रमाणावर संगोपन केले आहे, त्यामुळे या गोवंशाला ‘राठी’ किंवा ‘राठ’ (Rathi Cow Breed) असे नाव पडले.

देशी गायींमध्ये राठी जातीची गाय ही फार चांगली मानली जाते. राजस्थानच्या (Rajasthan Cow Breed) बीकानेरपासून ते पंजाबच्या सीमेपर्यंतच्या प्रदेशात आढळणाऱ्या या गायीला (Rathi Cow Breed) राजस्थानची कामधेनूही (Kamdhenu Of Rajasthan) म्हटले जाते. या जातीच्या गायी देशाच्या अनेक भागात सहज दिसतात. उत्तर प्रदेशात शेतकरी या गायी कमी किमतीत विकत घेऊन पाळू शकतात. या गायींची किंमत 20 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत आहे.

साहिवाल गायीशी मिळते जुळते गुणधर्म या गायीचे आहेत. इतर गाई पेक्षा दूध देण्याची क्षमता या गाईंची जास्त असते. जर वातावरण पोषक असेल तर पशुपालक या गाईंपासून (Rathi Cow Breed) जास्तीचे दुधाचे उत्पन्न (Cow Milk Production) मिळू शकतात.

शरीर रचना

राठी गाय (Rathi Cow Breed) ही तिच्या रंगाने आणि आकाराने दिसायला आकर्षक आहे. या गोवंशाचा आकार मध्यम असून अंग भरीव असते. या गोवंशाचे डोके मोठे असून कपाळ रूंद आणि पसरलेले असते. डोळे काळे आणि पाणीदार असतात. कान छोटे असून आतील बाजूस लालसर तपकिरी असतात. या गोवंशाची मान थोडी आखूड असून गळकंबळ किंवा पोळी थोडी मोठी आणि आखीव असते. पाय सामान्य आकाराचे असून खुर मात्र मोठे आणि काळे असतात. शेपटी लांब असून शेपुटगोंडा झुपकेदार, केसाळ आणि काळ्या रंगाचा असतो. या गोवंशाचा रंग लाल-तांबडा असून त्यावर पांढरे डाग असतात आणि पोटाशी रंग फिक्कट होत गेलेला असतो.

या जातीच्या गायीची उंची सुमारे 144 सेंटीमीटरपर्यंत आहे. याशिवाय राठी जातीच्या गायीचे वजन सुमारे 300 किलो असते. या जातीच्या बैलाचे वजन सुमारे 350 किलो असते.

दूध उत्पादन

देशी जातीच्या गायीत राठी गाय ही दूध उत्पादनात सर्वात महत्त्वाची मानली जाते. या जातीची गाय ही एक वर्षाला सुमारे 2800 किलो दूध देते.

वयाच्या 36 ते 52 व्या वर्षी राठी गाईचे पहिले दुग्धपान सर्वोत्तम मानले जाते. त्यानंतर ते दररोज 8 ते 18 लिटर दूध देते.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.