हॅलो कृषी ऑनलाईन: दरवर्षी आषाढी (Ashadhi Wari) वारी निमित्त (Sant Tukaram Palkhi) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरला (Pandharpur) जात असतात. त्याच बरोबर त्यांच्यासोबत संतांचे पालखी रथ (Tukaram Palkhi Bullock Cart) देखील जात असतात.
यावेळी बैलांच्या सहाय्याने हे पालखी रथ (Sant Tukaram Palkhi) ओढले जातात. त्यामुळे बैलजोडी (Bullock Pair) असणार्या शेतकर्याला आपल्या बैलजोडीला पालखीचा रथ ओढण्याचा मान मिळावा अशी आशा असते. यंदा जगदगुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजाच्या (Tukaram Maharaj) 339 व्या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू दरम्यानचा पालखी (Sant Tukaram Palkhi) रथ ओढण्याची व सेवा करण्याची संधी लोहगावच्या सुरज खांदवे यांच्या ‘हिरा व राजा’ आणि नांदेड गावच्या निखिल कोरडे यांच्या ‘मल्हार व गुलाब’ या बैलजोडीला मिळाली आहे. तर चौघडा गाडी ओढण्याचा मान टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या ‘नंद्या व संद्या’ या जोडीला मिळाला.
26 पैकी 3 बैलजोड्यांची झाली निवड
श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखीचा रथ (Tukaram Maharaj Palkhi Ratha) ओढण्यासाठी 26 बैलजोडीतून शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा बैलजोडीतून 2 बैलजोड्या पालखी रथासाठी व एक बैलजोडी चौघडा गाडीसाठी शोधण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा पालखी सोहळा प्रमुख व संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे यांनी ही निवड केली. माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे व भानुदास महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.
नांदेड, लोहगाव, चिखली टाळगावच्या बैलजोड्यांना मिळाला मान
सुरज ज्ञानेश्वर खांदवे हे श्री संत तुकाराम महाराजांचे आजोळ असलेले लोहगाव ता. हवेली. पुणे येथील शेतकरी असून त्यांच्या बैलजोडीचे नाव हिरा व राजा आहे. त्याच प्रमाणे नांदेड गाव ता. हवेली, पुणे येथील निखिल सुरेश कोरडे हेही शेतकरी असून त्यांनीही आपल्या मल्हार-गुलाब बैलजोडीला पालखी सोहळ्यासाठी संधी मिळावी, यासाठी अर्ज केला होता. तर पालखी रथाच्या (Sant Tukaram Palkhi) पुढे असलेल्या चौघडा गाडी ओढण्यासाठी चिखली टाळगाव या ऐतिहासिक गावातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक बाळासाहेब सोपान मळेकर यांच्या नंद्या व संद्या बैलजोडीला मान देण्यात आला, अशी माहिती विशाल महाराज मोरे यांनी दिली.