Seed Cum Fertilizer Drill Machine: ‘या’ एका मशिनने बियाणे पेरणीसोबतच होईल खते टाकण्याचे काम; जाणून घ्या फायदे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आजकाल कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण (Seed Cum Fertilizer Drill Machine) झपाट्याने वाढत आहे.शेतीच्या मशागतीच्या तयारीपासून पीक काढणीपर्यंतचे काम यंत्राच्या साहाय्याने केले जाते. कृषी यंत्रांच्या किंवा कृषी अवजारांच्या मालिकेत, एक मशीन आहे जे शेतात बियाणे पेरण्याबरोबरच जमिनीत खत मिसळण्याचे काम करते. हे यंत्र एकाच वेळी दोन कामे करते जेणेकरून शेतकऱ्याला स्वतंत्रपणे खत टाकण्याचे काम करावे लागणार नाही. या मशिनमध्ये बियाणे आणि खते एकत्र पडतात, त्यामुळे बियाणे पेरण्याबरोबरच खत टाकण्याचे काम केले जाते. सीड कम फर्टिलायझर ड्रिल मशीन (Seed Cum Fertilizer Drill Machine) असे या यंत्राचे नाव असून याला बियाणे कम खत यंत्र असेही म्हणतात. विशेष बाब म्हणजे या यंत्रावर शासनाकडून कृषी यंत्र प्रशिक्षण योजनेंतर्गत अनुदानही (Subsidy On Fertilizer Drill Machine) दिले जाते.

खत ड्रिल मशीन म्हणजे काय?

खत ड्रिल मशिन (Fertilizer Drill Machine) किंवा बियाणे कम खत यंत्राचा शेतकरी गरजेनुसार वापर करू शकतात. बियाणे जमिनीत पेरणे (Seed Sowing), ते एकसमान मिसळणे आणि विशिष्ट खोलीवर पेरणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. याशिवाय रासायनिक आणि सेंद्रिय खते जमिनीत (Fertilizer Application) मिसळण्यासाठी सुद्धा या यंत्राचा वापर केला जातो. अशाप्रकारे या मशिनच्या साहाय्याने दोन कामे एकाच वेळी केल्याने तुमचा वेळ आणि श्रम तसेच पैशाची बचत होऊ शकते. हे यंत्र (Seed Cum Fertilizer Drill Machine) ट्रॅक्टरला जोडून चालवले जाते.

खत ड्रिल मशीनने कोणती पिके पेरली जाऊ शकतात? (Crops Sown With Fertilizer Drill Machine)

खत ड्रिल मशिनने अनेक प्रकारच्या पिकांची पेरणी करता येते. परंतु प्रामुख्याने शेतकरी गहू, मका, बाजरी, तेलबिया, कडधान्ये, सोयाबीन इत्यादी पिकांची पेरणी करू शकतात.

खत ड्रिल मशीन वापरण्याचे फायदे  (Seed Cum Fertilizer Drill Machine Benefits)

  • बियाणे पेरणीचे काम खत ड्रिल मशिनच्या साहाय्याने सहज करता येते.
  • या यंत्राच्या वापराने बियाणे शेतात विखुरले जात नाही. बिया टाकण्याबरोबरच त्यांना मातीने झाकण्याचे कामही या यंत्राद्वारे केले जाते.
  • हे यंत्र ठराविक अंतर आणि खोलीवर बिया पेरण्याचे काम करते, त्यामुळे बियाणे समान अंतर आणि खोलीवर पेरले जाते.
  • या यंत्राद्वारे जमिनीत खतेसुद्धा टाकता येतात.
  • या यंत्राच्या वापराने बियाण्यांची उगवण क्षमता वाढून पीक उत्पादन चांगले मिळते.
  • शिवाय या यंत्राच्या साहाय्याने संपूर्ण शेतात खते मिसळली जाते, त्यामुळे तणांचे नियंत्रण करणे सोपे जाते.
  • कोरडवाहू जमिनीसाठी खत ड्रिल मशीनचा वापर अधिक फायदेशीर मानला जातो.

फर्टिलायझर ड्रिल मशीन/सीड कम खत यंत्राची किंमत (Price Of Fertilizer Drill Machine)

अनेक कंपन्यांचे फर्टिलायझर ड्रिल मशीन/सीड कम फर्टिलायझर मशीन (Seed Cum Fertilizer Drill Machine) बाजारात उपलब्ध आहे. ज्यामध्ये महिंद्रा सीड कम फर्टिलायझर मशीन, खेडूत सीड कम फर्टिलायझर मशीन, जॉन डियर फर्टिलायझर ड्रिल मशीन, दशमेश 911 सीड कम फर्टिलायझर ड्रिल मशीन ही खूप लोकप्रिय मशीन आहेत. फर्टिलायझर ड्रिल मशिन/सीड कम खत यंत्राची किंमत  रू. 20,000 ते 1.20 लाखापर्यंत आहे.