हॅलो कृषी ऑनलाईन: जिल्हा परिषद सेस फंड योजनेतंर्गत बियाण्यांवर 50 टक्के अनुदान (Seed Subsidy) मिळत आहे. मुख्यत: उडीद, भुईमुग, तूर हे बियाणे (Tur Seed) पंचायत समितीकडून अनुदानावर मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना बियाणे आवश्यक असल्यास त्यांनी आजपासूनच पंचायत समिती कृषी विभागात बियाणे मागणी (Seed Subsidy) अर्ज भरून द्यावे, असे आवाहन नाशिक पंचायत समिती मार्फत (Nashik Panchayat Samiti) करण्यात आले आहे. संबंधित योजनेचे अर्ज पंचायत समिती कृषि विभागात (Agriculture Department) उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- शेतक-यांचा (Farmers) मागणी अर्ज विहीत नमुन्यात घेण्यात यावा.
- अर्जासोबत स्वत:च्या कुटुंबाचे नांवे असलेले 7/12 व 8-अ चे अद्ययावत उतारे सादर करणे आवश्यक आहे.
- एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त 1 हेक्टरसाठी आवश्यक बियाण्याचा लाभ (Seed Subsidy) देण्यात यावा.
(सदर बियाणेचा लाभ देताना एका पेक्षा अधिक बियाणेचा क्षेत्र मर्यादेत लाभ देय आहे.)
दुबार लाभ नाही…
- अनुसुचीत जाती जमाती, अपंग व महिला शेतकर्यांसाठी शासनाने निर्धारीत केल्याप्रमाणे लाभ देण्यात येणार आहे.
- प्राधान्य क्रम ठरवताना अनु जाती/अनु. जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक व वनपट्टेधारक असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे.
- चालू आर्थिक वर्षात लाभ दिलेल्या शेतक-यांना दुबार लाभ दिला जाणार नाही.
- सदर योजना ही सन 2024-25 या वित्तीय वर्षात (खरीप रब्बी उन्हाळी हंगाम) मध्ये राबवण्यात येणार.
- योजनेसाठी आवश्यक बियाणे हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (Mahabeej) सातपूर, नाशिक या शासन अंगीकृत संस्थेकडून मंजूर दराप्रमाणे बियाणे (Seed Subsidy) खरेदी करुन पुरविण्यात येणार आहे.
50 टक्के अनुदानावर बियाणे
योजनेत 50 टक्के अनुदानावर तूर, मूग, उडीद, भुईमुग व हरभरा बियाणे (Seed Subsidy) देण्यात येणार आहेत. उर्वरित 50 टक्के वसूल करावयाची रक्कम गटस्तरावर बियाणे वाटप करण्यापूर्वी शेतकर्यांकडून वसूल करुन पुरवठादार संस्थेच्या नावे डी डी धनादेश काढून या कार्यालयास पाठविण्यात येणार. अनुदानाचे प्रस्ताव गटस्तरावर संपूर्ण कागदपत्रांसह दप्तरी असतील. वाटप रजिस्टर अद्ययावत ठेवण्यात येणार. बियाणे वाटप केल्यानंतर तसेच पेरणी झाल्यानंतर कृषि अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषि) यांनी 100 टक्के क्षेत्रीय तपासणी करुन त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात येणार. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
बियाणे आणि त्यांची किंमत
या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ नाशिक यांच्याकडून हे बियाणे (Seed Subsidy) पुरवण्यात येत आहेत.
तूर बियाण्याची दोन किलोची बॅग असून तिची किंमत 420 रुपये आहे, तर शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर देण्यात येत असल्याने ती केवळ 210 रुपयाला मिळणार आहे.
मूग बियाण्यांची 02 किलोची बॅग 450 रूपयांना असून शेतकऱ्यांना किंवा 225 रुपये भरावे लागणार आहेत.
उडीद बियाण्यांची दोन किलोची बॅग असून ती 380 रूपयांना असून यासाठी शेतकऱ्यांना केवळ 190 रुपये भरावे लागणार आहे.
तर भुईमुगाची 20 किलोची बॅग असून 3200 रूपयांना आहे. शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 1600 रूपयांना मिळणार आहे.