काही मिनिटांत जमीन मोजण्याची पद्धत | Shet Jamin Mojani

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । जमीन मोजणे तसे जिकिरीचे काम असते. जमीन मोजायची म्हणजे मोजपट्टी आली मग त्यासाठी काही लोक आले त्यामुळे जमीन मोजणे तसे गुंतागुंतीचे काम असते. पण जर आता कमी मेहनतीत जमीन मोजायची असेल तर तसे काही पर्याय आता उपलब्ध होत आहेत. यासाठी आता फुटपट्टीची गरज भासणार नाही आहे.  केवळ स्मार्ट फोन ज्यामध्ये इंटरनेट आणि जीपीएस असेल त्याच्या माध्यमातून जमीन मोजता येणार आहे. असे एक ऍप्लिकेशन आता आले आहे. हे ऍप्लिकेशन आता अत्यंत सोप्या पद्धतीने जमीन मोजण्याचे काम करणार आहे. “distance and area measurement”  हे ऍप जमीन मोजण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे ऍप इन्स्टॉल करून जीपीएस ऑन केल्यास आपोआप जमीन मोजण्याचे काम ते करेल. Shet Jamin Mojani

ऍप्लिकेशन उघडल्यानंतर त्यात आपल्याला अंतर हे फूट यार्ड, मीटर असे काही पर्याय आहेत ते निवडावे लागतात. शेतीची जमीन मोजत असाल तर एकर हा पर्याय तुम्ही निवडू शकता. त्यांनतर खाली जाऊन स्टार्ट बटण दिसते त्याला क्लिक करायचे असते. मग तुम्ही आपल्या जमिनीला एक फेरी मारायची आहे. जेवढी जमीन तुम्हाला मोजायची आहे तेवढ्याच जमिनीला फेरी मारायची असते. चुकून अनावश्यक जमिनीवर फेरी मारल्यास माप चुकू शकते. फेरी पूर्ण झाल्यावर लगेच जमिनीचे माप आपल्याला समजते. या ऍप्लिकेशन द्वारे जमिनीच्या मापाचे कच्चे अनुमान लावता येते.  Shet Jamin Mojani

मोबाईल ऍपद्वारे शेतजमीन मोजण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला पैसे खर्च करावे लागत नाहीत. शेती मोजणाऱ्या व्यक्तीशिवाय सहज तुम्ही जमीन मोजू शकता तसेच मोजपट्टीशिवाय तुम्ही जमीन मोजू शकता. त्यामुळे आता कुणीही सहज जमीन मोजू शकणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!