Tractor: बाजारात लवकरच येणार, अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी वजनाने हलका नवा ट्रॅक्टर! जाणून घ्या वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: अलीकडच्या काळात शेतात ट्रॅक्टरचा (Tractor) वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.  परंतु अल्पभूधारक आणि लहान शेतकर्‍यांना (Small Farmers) मोठ्या आकाराचे आणि जड ट्रॅक्टर (Big And Heavy Tractor)  घेणे परवडत नाही आणि शेतकामासाठी ते सोयीस्कर सुद्धा नसते. या शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीसाठी आटोपशीर, परवडण्याजोगे, सहज हाताळण्याजोगे ट्रॅक्टर (Small Lightweight Tractor) लाभदायक ठरतात.

या समस्येवर उपाय शोधण्यासाठी सी एस आय आर-केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (CSIR- CMERI) विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या समानता, सशक्तीकरण आणि विकास विभागाच्या सहाय्याने अल्पभूधारक आणि लहान शेतकर्‍यांसाठी आटोपशीर, परवडणाऱ्या आणि सहज हाताळण्यायोग्य तसेच कमी अश्वशक्तीवर चालणार्‍या ट्रॅक्टरची निर्मिती (Tractor Production) केली आहे.

हे ट्रॅक्टर (Tractor) शेतकर्‍यांना वितरित करता यावे या उद्देशाने एका सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाने ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी उत्पादन प्रकल्प (Tractor Production Project) उभारण्याची योजना आखली आहे.

या तंत्रज्ञानाचा प्रसार त्यांनी सध्या कार्यरत असलेल्या अनेक स्वयंसहाय्यता गटांमध्ये केला असून या विशिष्ट तंत्रज्ञानासाठी नवीन स्वयंसहाय्यता गट तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न देखील सुरू आहेत. याशिवाय या प्रकारच्या ट्रॅक्टरच्या उत्पादनासाठी स्थानिक कंपन्यांना परवाने देण्याबद्दल CSIR- CMERI विचारविनिमय करत असून तसे झाल्यास त्याचे लाभ स्थानिक शेतकर्‍यांना मिळू शकतील.

काय असणार ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये (Key Features Of Tractor)

  • हा ट्रॅक्टर 9 एचपी डिझेल इंजिनने 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स स्पीडसह विकसित केला आहे.
  • यात 540 PTO हा 6-स्प्लिन शाफ्ट आहे ज्याचा वेग 540 रेव्होल्यूशन प्रति मिनिट इतका आहे.
  • ट्रॅक्टरचे एकूण वजन सुमारे 450 किलोग्रॅम आहे, त्याच्या पुढील आणि मागील चाकाचे आकार अनुक्रमे 4.5 -10 आणि 6-16 आहेत.
  • व्हीलबेस, ग्राउंड क्लीयरन्स आणि टर्निंग त्रिज्या अनुक्रमे 1,200 मिमी, 255 मिमी आणि 1.75 मीटर आहेत.

या ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतीची कामे जलद गतीने होऊ शकतील कारण बैलगाडीला ज्या कामासाठी काही दिवस लागतात त्या तुलनेत ते काम काही तासांत पूर्ण होईल आणि शेतकर्‍यांचे भांडवल आणि देखभाल खर्च देखील कमी होईल. म्हणूनच हे परवडण्याजोगे, आटोपशीर ट्रॅक्टर अल्पभूधारक आणि लहान शेतकर्‍यांच्या उपयोगी असून ते बैलगाडीच्या नांगराची जागा घेतील. 

हे तंत्रज्ञान जवळपासच्या गावांमध्ये आणि विविध उत्पादकांना दाखवण्यात आले आहे. रांची येथील एका एमएसएमईने या ट्रॅक्टर्सचे (Tractor) मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात रुची दाखवली आहे. शेतकर्‍यांना विविध राज्य सरकारांच्या निविदाच्या माध्यमातून अनुदानित दराने ट्रॅक्टर्स पुरवण्याची त्यांची योजना आहे.