हॅलो कृषी ऑनलाईन: सोयाबीन (Soybean Seeds) हे खरीपातील एक मुख्य पीक आहे. बहुतेक शेतकरी खरीपात सोयाबीन लागवड करणार आहेत. सध्या पेरणीपूर्व मशागत पूर्ण होत आली असून सोयाबीन बियाणे (Soybean Seeds) पेरणीसाठी शेतकर्यांची लगबग सुरु आहे. दरम्यान मागील दोन वर्षात शेतकर्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणांचा (Certified Seeds) वापर पेरणीसाठी करू शकतात असे कृषी विभागाने (Agriculture Department) सांगितले आहे.
तसेच मागील दोन वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणांपासून उत्पादित झालेले (Seed Production) सोयाबीन बियाणे (Soybean Seeds) चालू वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरू शकतात.
तसेच ग्रामबिजोत्पादन (Gram Bijotpadan) पीक प्रात्यक्षिके योजनांतर्गत आलेल्या उत्पादनातून बियाणांची निवड करता येते.
सोयाबीन बियाण्याची वाहतूक व हाताळणी यामध्ये इजा झाल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होतो त्यामुळे दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. जाणून घेऊ या कृषी विभागाने दिलेला सल्ला.
सोयाबीन बियाण्यांसाठी कृषी विभागाचा सल्ला (Soybean Seeds)
- बियाण्यांची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
- घरगुती बियाणे वापरत असल्यास अंकुरण क्षमता घरच्या घरी तपासून घ्यावी.
- साठवणूकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर न करता ज्यूट बारदानाचा वापर करावा.
- बियाणे साठवताना त्याची थप्पी 7 फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी.
- पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रीया करावी यामुळे बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करता येते.
- रायझोबियम व पीएसबी जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास पेरणीपूर्व तीन तास अगोदर बीजप्रक्रीया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी.