हॅलो कृषी ऑनलाईन: कीर्तनकार त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन (Success Story) करतात हे आपल्या सर्वांना माहित तर आहेच. पण आज आपण अशा कीर्तनकार महाराजांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी (Animal Fodder) ज्वारीची लागवड (Jowar Fodder Crop) केली आणि त्यांची ज्वारी चक्क 16 फुट उंच वाढलेली आहे (Success Story).
उदापूर गावचे भागवताचार्य समाज प्रबोधनकार ह.भ.प. गणेश महाराज शिंदे (Ganesh Maharaj Shinde) यांनी आपल्या वडिलोपार्जित एक एकर शेतीमध्ये अन्य फळभाजी पिकांना फाटा देत जनावरांच्या चाऱ्यासाठी मका (Maize) व बेंद्रीचे (ज्वारी) पीक (Jowar Crop) घेतले होते.
त्यामधील बेंद्रीचे म्हणजेच ज्वारीचे पीक सध्या 15 कांड्याच्या स्थितीमध्ये असून, उसाएवढी जाडी व उंची तब्बल 16 फूट एवढी झाली आहे (16 Feet Tall Jowar Fodder Crop). त्यामुळे उदापूर पंचक्रोशीतील शेतकरी हे पीक पाहण्यासाठी भेट देत आहे (Success Story).
वारकरी संप्रदायाचा वसा व वारसा घेऊन शिंदे महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजप्रबोधन करत आहेत, तसेच गोवर्धनाचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे शेती घेऊन गोशाळा (Goshala) उभारली आहे.
सध्या या गोशाळेमध्ये गावठी गाई, म्हैस, गावठी बैल, वासरे अशी जनावरे असल्यामुळे त्यांना चारा मिळावा यासाठी उदापूर येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये फळभाज्यांमधून उत्पन्न घेण्यापेक्षा सतत मका व ज्वारी यांची लागवड करून मुक्या जनावरांच्या खाण्यापिण्याची सोय करत आहे.
या शेतातील बेंद्रीच्या पिकाची उंची तब्बल 16 फुटांची झाली असल्यामुळे अनेक शेतकर्यांमध्ये हा कुतूहलाचा विषय बनला आहे. परिसरात पहिल्यांदाच पिकाची उंची एवढी मोठी झाल्याने पंचक्रोशीतील शेतकरीदेखील बेंद्रीचे पीक पाहण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत.
अशी केली चारा पिकाची लागवड
- शेतीमध्ये प्रथम सरी पाडून त्यामध्ये ट्रायल बेसिसवर मेघा स्वीट नावाच्या ज्वारीचे एक किलो बियाणे पेरले व बाकीच्या शेतीमध्ये मका पेरला.
- एकच कीटकनाशक फवारणी करून नंतर कुठलीही रासायनिक फवारणी न करता गोमूत्र व शेण खतावर भर दिला.
- एक एकरमध्ये साधारण पंचवीस हजार रुपये खर्च आला आहे.
- जनावरांच्या चाऱ्यासाठी अनेक शेतकरी एका सरीसाठी पाच हजार रुपये किंमत मोजायला तयार आहेत.
- अशा पंचवीस सरी उपलब्ध असल्यामुळे साधारण हा चारा विक्रीसाठी उपलब्ध केला तरी सव्वा लाखाचे उत्पन्न मिळेल, असे ह.भ.प. गणेश महाराज शिंदे यांनी सांगितले.
समाज प्रबोधन सोबतच पशुप्रेम दाखवणारी कीर्तनकार ह.भ.प. गणेश महाराज शिंदे यांची कृती खरच बोध घेण्यासारखी आहे (Success Story).