हॅलो कृषी ऑनलाईन : हल्लीचा युवावर्ग आपल्याला बहुतेककरून उच्चशिक्षण घेऊन नोकरीकडे वळताना दिसतो. मात्र कोकणातल्या एका ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असलेल्या तरुणाने आपल्या जिद्दीच्या जोरावर चक्क फिशिंग च्या माध्यमातून यशस्वी प्रायोग करून अनेकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.
पडीक खार जमिनीवर उभारला भव्य कोळंबी शेतीचा प्रकल्प
या युवकाचे नाव अपूर्व फर्नाडिस असे आहे. मालवण मधील आचऱ्यासारख्या ग्रामीण भागात कोळम्बी प्रकल्प उभारला आहे. 15 एकर पडीक खार जमिनीवर कोळंबी शेतीचा भव्य प्रकल्प उभारला आहे. एकूणच कोकणात सध्या मत्स्य दुष्काळासारख संकट उभं ठाकलं आहे. माशांची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत मासे मिळण्याचे प्रमाण घटलं आहे. त्यामुळे नवे मत्स्य साठे निर्माण करण्यासाठी अपूर्वचा हा प्रयोग निश्चित उपयोगी ठरत आहे.अपूर्वने स्वतः एका मोठ्या व्यवसायात उडी घेऊन ही सर्व टीका पुसून काढली आहे. शेकडो टन कोळंबी तो गोव्यासह महाराष्ट्रात पाठवतोय. खारपड जमीन म्हणजे विनावापर जमीन याच जमिनीतून तो सोनं पिकवतोय. कोळंबी शेतीतून यशस्वी उद्योगपती बनण्याची त्याची स्वप्न आहेत.