हॅलो कृषी ऑनलाईन: भेंडवळ येथे घट मांडणी मध्ये काय भाकीत होणार याची उत्सुकता दरवर्षी शेतकऱ्यांना लागून राहिलेली असते. किंबहुना या भाकीतावर शेतकरी डोळे लावून बसलेला असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा तील प्रसिद्ध भेंडवळची घटमांडणी शासनाच्या निर्बंधांमुळे पारिवारिक पूजा करूनच घरातूनच करण्यात आली. याबाबतची माहिती सारंगधर महाराज वाघ यांनी दिली आहे. आता या मांडणीमध्ये कोणते निष्कर्ष आले आहेत ते पाहूया.
या भाकितानुसार या वर्षी जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात होणार असून ऑगस्ट महिन्यात साधारण सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसातून आगामी वर्षात दिलासा मिळेल. शेतकऱ्यांसाठी संमिश्र भाकीत घट मांडणीत करण्यात आले आहे. या वर्षी कापूस, ज्वारी, भुईमूग अशी पिके चांगल्या प्रमाणात येणार असून भावही चांगला राहणार आहे. मात्र तांदूळ, वाटाणा, जवस, गहू या वर्षी चांगले आले तरी या पिकांना मात्र भाव राहणार नाही. असे भाकीत येथे करण्यात आले आहे.
रोगराई जास्त प्रमाणात असणार
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भाकितात सर्वांचे लक्ष होतं ते म्हणजे या वर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार आहे. कोरोना साध्या महामारी धून दिलासा मिळण्याचा या वर्षभरात तरी शक्यता नाहीये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज भेंडवळची घटमांडणीचे भाकीत जाहीर केले. या वर्षी देशावर रोगराईच संकट मोठ्या प्रमाणावर आहे. तर आर्थिक टंचाई सुद्धा भासेल असे भाकीत यावेळी करण्यात आले आहे.
देशाच्या प्रधानावरही संकट
याबरोबरच पृथ्वीवर मोठं संकट येईल. तर संपूर्ण जगात आर्थिक टंचाई भासेल. देशाच्या राजाची गादी कायम राहणार असून मात्र राजाला अनेक अडचणींचा तणावाचा सामना करावा लागेल. असं भेंडवळची घटमांडणी सांगण्यात आले आहे. देशाच्या प्रधानावर ही संकट आहे. असे भाकीत या घट मांडणी व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय देशाच्या संरक्षण खात्यावर दबाव आणि ताण राहणार असून घुसखोरीचा प्रभाव राहील असंही या भागात सांगण्यात आला आहे.
या घट मांडणी साठी दर वर्षी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, खान्देश या ठिकाणाहून विविध शेतकरी येत असतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी हे भाकीत सांगितलं जातं 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरु केली होती. जे त्यांचे वंशज आजही पुढे चालवत आहेत. सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकित व्यक्त केले आहे.