Tomato News : टोमॅटो चोरीच्या घटना थांबतात थांबेनात! पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या शेतीतून 2 लाख 70 हजारांचे टोमॅटो गेले चोरीला

Tomato Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tomato News । सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत टोमॅटोचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. मात्र सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक बजेट कोलमडले असले तरी शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. टोमॅटो उत्पादनातून शेतकरी लखपती ते करोडपती झाले आहेत. अशा आपण अनेक बातम्या ऐकल्या असतील त्याचबरोबर टोमॅटो चोरीला गेल्याच्या देखील आपण अनेक बातम्या ऐकल्या असतील. सध्या देखील टोमॅटो चोरीला गेल्याची एक घटना समोर आली आहे.

सोलापूर मधील पडसाळी येथील शेतकऱ्याचे टोमॅटो शेतातून चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या शेतकऱ्याचे जवळपास दोन लाख 70 हजार रुपयांचे टोमॅटो चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बालाजी भोसले आणि धनाजी भोसले असं टोमॅटो चोरीला गेलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सध्या टोमॅटो चोरीला जाण्याच्या घटना जास्तच वाढू लागल्या आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. सोलापूर मधील या घटनेने तेथील आसपासच्या परिसरात शेतकऱ्यांमध्ये तर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इथे चेक करा टोमॅटोचे बाजार भाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर टोमॅटो खरेदी करण्याआधी किंवा टोमॅटो विकण्याआधी टोमॅटोचे बाजार भाव चेक करायचे असतील तर आताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही टोमॅटोचे रोजचे बाजार भाव चेक करू शकता. त्याचबरोबर इतर शेतमालाचे देखील तुम्ही बाजारभाव चेक करू शकता. त्यामुळे लगेचच प्ले स्टोर वर जा आणि हे ॲप इन्स्टॉल करा.