हॅलो कृषी ऑनलाईन: ‘टनेल फार्मिंग’ (Tunnel Farming) हे असे एक तंत्र आहे ज्यामध्ये पॉलिथिलीनच्या (प्लास्टिक) झाकलेल्या संरचनेच्या आत पिकाचे उत्पादन घेतले जाते. या पद्धतीत ऑफ सीजन पिकांची (Off Season Crops) लागवड केली जाते. या तंत्रज्ञाना अंतर्गत वाढणारी पिके पाऊस, गारपीट, बर्फ, वारा, दव आणि कीटकांसारख्या पर्यावरणीय घटकांपासून संरक्षित केले जाते.
टनेल फार्मिंग (Tunnel Farming) द्वारे प्लॅस्टिकच्या संरचनेत नियंत्रित वातावरणात (Controlled Environment) रोपे उगवली जातात. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी आहे, त्यामुळे शेतकरी कमी जोखीम घेऊन चांगले उत्पन्न (More Profit) मिळवू शकतात.
टनेल फार्मिंग फायदे (Tunnel Farming Benefits)
आज जगभरातील अनेक शेतकरी टनेल फार्मिंग (Tunnel Farming) तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. ही कृषी क्षेत्रातील एक क्रांतीच आहे.
- या तंत्राने शेतकरी भाजीपाला आणि फळांची लागवड करून चांगला नफा कमवू शकतात.
- टनेल फार्मिंग पर्यावरणासाठी देखील सुरक्षित आहे.
- अनेक प्रकारची फळे, भाजीपाला आणि फुले यांच्या उत्पादनासाठी टनेल फार्मिंग योग्य आहे.
- टनेल फार्मिंगमुळे हवामानातील अचानक होणार्या बदलापासून पिकाचे संरक्षण होते.
- हे शेती तंत्र भाजीपाला, फळे, फुले आणि औषधी वनस्पतींसह विविध प्रकारचे पीक वाढवण्यासाठी वापरले जाते.
- खराब हवामानात सुद्धा शेतकरी या तंत्राने पिके घेऊ शकतात.
हिवाळी पिकांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान (Tunnel Farming For Winter Crops )
टनेल फार्मिंग ही एक कृषी प्रणाली आहे ज्यामध्ये सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात झाडे उगवली जातात. यामध्ये नैसर्गिक उपायांचा वापर केला जातो. साधारणपणे हिवाळ्यासाठी (Winter Season) टनेल फार्मिंग उत्तम मानली जाते. कोणत्याही वनस्पतीच्या वाढीसाठी, किमान 10 अंश तापमान आवश्यक आहे आणि हिवाळ्यात तापमान कमी राहते. मात्र, या तंत्राद्वारे झाडांना योग्य तापमान देता येते. त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते.
टनेल फार्मिंग शेतीचे तंत्रज्ञान (Tunnel Farming Technique)
टनेल फार्मिंग अंतर्गत शेतात एक मीटर रुंद बेड तयार केले जातात आणि त्यावर बांबू किंवा पाईप वाकवून अर्ध्या चंद्राच्या आकाराची रचना केली जाते. या तयार बेडवर चंद्रकोर आकाराच्या (अर्ध्या गोलाकार) रचना लोखंडी तारांनी जोडल्या जातात आणि 1.5 ते 2.0 मीटरच्या अंतराने जमिनीत गाडल्या जातात. मग त्यावर एक पारदर्शक प्लास्टिक फिल्म (फॉइल) झाकली जाते. चंद्रकोराच्या आकाराच्या रचनांना फिल्मने झाकल्यानंतर, त्यांचे खालचे भाग (किनारे) मातीत दाबले जातात.
दिवसा सूर्यप्रकाशात आतले तापमान वाढते, जे झाडाच्या वाढीसाठी चांगले असते. त्यामुळे पावसाचा धोका, कीटकांचा प्रादुर्भाव आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होतो.
या प्रकारच्या शेतीमध्ये जेव्हा दिवसा सूर्यप्रकाश प्लास्टिकवर पडतो तेव्हा बोगद्याच्या आतील तापमान सुमारे 10 ते 12 अंशांनी वाढते. त्यामुळे हिवाळ्यातही या तंत्रज्ञानाचा वापर करून भाज्या यशस्वीपणे पिकवता येतात.
टनेल फार्मिंग द्वारे कोणत्या पिकाचे उत्पादन घेता येते?
- टनेल फार्मिंग द्वारे भाजीपाला पिके (Tunnel Farming For Vegetable Crops) जसे काकडी, टोमॅटो, सिमला मिरची, कारले आणि स्क्वॅश इत्यादीची लागवड करता येते.
- टरबूज आणि स्ट्रॉबेरी या फळपिकांची लागवड (Fruit Crop Cultivation) सुद्धा करता येते.
- इतरही फळे आणि भाजीपाला या पद्धतीद्वारे यशस्वीपणे पिकवला जातो.