हॅलो कृषी ऑनलाईन: तुरीचा नवीन वाण (Tur Variety) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (MPKV, Rahuri) अंतर्गत कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसित केलेला आहे. फुले पल्लवी’ (Phule Pallavi) असे या वाणाचे नाव असून अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य, कानपूर द्वारे या वाणास मान्य करण्यात आले आहे. 155 ते 160 दिवसांच्या मध्यम पक्वता कालावधी असलेला हा वाण देशातील मध्य भाग जसे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे (Tur Variety).
उत्पादकता आणि रोगप्रतिकारशक्ती
- ‘फुले पल्लवी’ या वाणाची (Tur Variety) सरासरी उत्पादकता प्रति हेक्टरी 21.45 क्विंटल इतकी आहे.
- या वाणाचे दाणे टपोरी आणि फिकट तपकिरी रंगाचे असून, 100 दाण्यांचे वजन 11.0 ग्रॅम आहे.
- मर (Wilt Disease Resistant Variety) आणि वांझ या तूर पिकातील प्रमुख रोगांना हा वाण मध्यम प्रतिकारक आहे.
- शेंगा पोखरणारी अळी (Pod Borer Resistant Tur variety ) आणि शेंगमाशी या किडींपासूनही या वाणाला कमी धोका आहे.
‘फुले पल्लवी’ या नवीन तूर वाणाच्या (Tur Variety) आगमनाने, शेतकर्यांना अधिक उत्पादन आणि चांगल्या प्रतिचे तूर उत्पादन मिळवण्यास मदत होईल. तसेच, रोग आणि किडींपासून होणार्या नुकसानीपासूनही संरक्षण मिळेल.
‘फुले पल्लवी’ (फुले तूर 12-19-2) हा वाण विकसित करण्यात डॉ. एन.एस. कुटे (पीक उत्पादन तज्ञ आणि प्रमुख शास्त्रज्ञ), डॉ. व्ही.एम. कुलकर्णी (वरिष्ठ संशोधन सहाय्यक), डॉ. व्ही.ए. चव्हाण (तूर रोगशास्त्रज्ञ) आणि डॉ. सी.बी. वायळ (तूर किटकशास्त्रज्ञ) यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील आणि संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण झाले.