Turki Bajara Seeds : 3 फुट बाजरीचे कणीस, एकरी 30 क्विंटल उत्पादन; पेरा तुर्कीची बाजरी!

Turki Bajara Seeds Get 30 Quintal Production
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये योग्य बियाण्याची निवड, (Turki Bajara Seeds) पाण्याची आणि विजेची उपलब्धता असेल तर शेतकरी या तीन गोष्टींच्या जोरावर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात. अशातच आता तुर्की या देशातील गावरान बाजरीच्या बियाण्याच्या माध्यमातून बारामती येथील शेतकरी सतीश सकुंडे यांनी बाजरीची पेरणी केली आहे. या बाजरीपासून त्यांना अडीच ते तीन फूट लांब कणीस मिळाले असून, त्यापासून यंदा एकरी 30 क्विंटल उत्पादन (Turki Bajara Seeds) मिळणार आहे. असे ते सांगतात.

कृषी प्रदर्शनात प्रात्यक्षिक (Turki Bajara Seeds Get 30 Quintal Production)

सध्या 18 ते 22 जानेवारी या कालावधीत पुणे जिल्ह्यातील बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फ़त कृषीक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात या तुर्की देशातील बाजरीच्या बियाण्याच्या उत्पादित कणसाचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते. जे येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आज या कृषीक प्रदर्शनाची सांगता झाली मात्र गेल्या चार दिवसांपासून प्रदर्शनात याच बाजरीची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.

‘या’ शेतकऱ्यांकडून यशस्वी लागवड

दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही उत्तरप्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील शेतकरी लव शर्मा हे गेल्या काही वर्षांपासून तुर्कीच्या बाजरीच्या बियाण्यापासून अधिक उत्पन्न मिळवत असल्याचे समोर आले होते. तर महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांत धुळे आणि बारामती या दोन ठिकाणच्या शेतकऱ्यांनी हा तुर्कीच्या बाजरीचा प्रयोग यशस्वी केल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षभरापूर्वी धुळे जिल्हयातील डॉ. अनिल जैन या शेतकऱ्याने तुर्कीच्या या बाजरीचे यशस्वी उत्पादन घेतल्याचे मागे समोर आले होते. याशिवाय राज्यातील अन्य भागांमध्येही काही शेतकऱ्यांनी या तुर्कीच्या बाजरीची मागील काही कालावधीत यशस्वी लागवड केली असल्याचे समोर आले आहे.

किती मिळते उत्पन्न?

खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामामध्ये या तुर्कीच्या बाजरीची पेरणी केली जाते. या बाजरीमध्ये टपोऱ्या दाण्यांनी भरलेली, अडीच ते तीन फूट लांब कणसे असतात. ज्यामुळे तिच्यापासून एकरी 30 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. महाराष्ट्रातील बाजरी दराचा विचार करता, शेतकऱ्यांना एकरी 75 हजार रुपयापर्यंत या बाजरीतून उत्पन्न मिळू शकते. असे शेतकरी सतीश सकुंडे आपल्या अनुभवातून सांगतात.

Gorakshnath Thakare
सकाळ, ABP माझा, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. शेती क्षेत्रात विशेष रस असून शेतमाल प्रक्रिया उद्योग, बाजारभाव, वायदेबाजार, तंत्रज्ञान आदी विषयांची आवड आहे.