Turmeric Seed Rate: हळदीच्या बेण्याला प्रति क्विंटल 5000 रुपये भाव; परंतु तुटवड्याने शेतकरी हैराण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: यावर्षी हळदीला समाधानकारक भाव (Turmeric Seed Rate) मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हळद (Turmeric) लागवड  करण्याचा निर्णय घेतला; पण हळद लागवड करण्याच्या सुरुवातीलाच हळद बेण्याला पाच हजार रुपये क्विंटल भाव सांगितला जात असून, बेण्याचा तुटवडादेखील जाणवत आहे. मग हळदीची लागवड करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत (Turmeric Seed Rate).

यावर्षी पाऊस चांगला राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे खरीप हंगामात हळद पीक (Kharif Turmeric) घ्यावे, असे शेतकर्‍यांना वाटत आहे. त्यामुळे तर शेतकरी हळदीचे बेणे विकत घेऊ लागले आहेत. गतवर्षी बेण्याला 2 हजार रुपये क्विंटल असा भाव (Turmeric Seed Rate) होता. यावर्षी सुरुवातीपासूनच हळदीला 15 हजाराच्या वर भाव मिळत असताना बेण्याचा भावदेखील 3 हजारांनी वाढलेला आहे. त्यामुळे शेतकरी (Farmers) चिंताग्रस्त झाले आहेत.

दुसरीकडे काही झाले तरी यावर्षी हळदीला प्रथम क्रमांक दिला जाईल, असे शेतकरी म्हणू लागले असून, चांगल्या प्रकारे शेती मशागतीची कामे करीत हळद लागवडीची पूर्व तयारी शेतकरी जोमाने करू लागले आहेत.

शेतकर्‍यांना दोन वर्षांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे हळदीचे बेणे आहे, अशा शेतकऱ्यांनी ठराविक अंतरामध्ये हळद लागवड करीत बेणे वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच इतर शेतकर्‍यांना योग्य दराने बेणे उपलब्ध करून देत, एकमेकांना सहकार्य करावे, असे काही शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

गत खरीप, रबी हंगामात शेतीमालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत.

सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या शेतमालापेक्षा हळदीला समाधानकारक भाव मिळाला म्हणून हळद लागवड (Turmeric Cultivation) करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून, हळद लागवडीची तयारीही केली आहे; पण लागवडीच्या प्रारंभीच बेण्याचा भाव (Turmeric Seed Rate) वाढलेला आहे, तुटवडा जाणवत असल्याने बेण्यासाठी शेतकर्‍यांना शोधाशोध करावी लागत आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.