Ujani Dam Water Level: दमदार पावसाने आणली आनंदाची बातमी; उजनी धरणाची पाणी पातळी 2 टक्क्यांनी वाढली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. भीमा व नीरा (Ujani Dam Water Level) खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे (Monsoon) भीमा खोऱ्यातील उजनीवरील 18 धरणांत (Ujani Dam Water Level) दमदार पावसाने हजेरी लावली.

तर उजनी धरण (Ujani Dam Water Level) पाणलोट क्षेत्रात 1 जूनपासून 75 मिलिमीटर पावसाची (Rainfall Record) नोंद झाली आहे. यामुळे उजनी धरणाची (Ujani Dharan) पाणी पातळी दोन टक्क्यांनी वाढली आहे. 1.012 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

रविवार दि. 9 रोजी सायंकाळी 6 वाजता धरणात वजा 57.91 टक्के पातळी झाली आहे. तर एकूण 31.02 टीएमसी पाणीसाठा आहे. उजनीकडे येणाऱ्या दौंड येथील विसर्गास सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजता 6 हजार 286 क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत होता.

दौंड येथील विसर्गाने उजनी धरणाची पाणी पातळी (Ujani Dam Water Level) वाढण्यास मदत होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात उजनी धरणाची पाणी पातळी वाढू लागल्याने शेतकर्‍यांना आनंद झाला आहे.

एक महिना अगोदर दौंड येथून विसर्ग
गत वर्षी 26 जून रोजी उजनी (Ujani Dam Water Level) पाणलोट क्षेत्रात 21 मि. मी. पाऊस झाला होता. एकूण 461 मि. मी. पावसाची नोंद झाली होती. तर दौंड येथून उजनी धरणात 11 जुलैपासून पाणी येण्यास सुरुवात झाली होती. या वर्षी एक महिना अगोदर दौंड येथून विसर्ग सुरू झाल्याने सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

भीमा खोऱ्यातील घोड, खडकवासला (Khadakwasla Dam), पानशेत (Panshet Dam), चासकमान, मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक पाऊस झाला असून भीमा खोऱ्यातील 18 धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. नीरा खोऱ्यातील गुंजवणी, नीरा देवधर, नीरा, भाटघर या धरण क्षेत्रात दमदार पावसाचे आगमन (Monsoon In Maharashtra) झाले आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.