हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे बंदर (Vadhavan Port) उभारणी करण्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. राज्याच्या विकासासाठी (Maharashtra) ही अत्यंत महत्त्वाची बाब असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राज्याचे बंदरे (Vadhavan Port) विकास मंत्री संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत.
जगातील 10 मोठ्या बंदरांपैकी (Ten Biggest Port In World) देशातील वाढवण हे एकमेव मोठे बंदर (Vadhavan Port) असणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी (Employment Opportunities) निर्माण होणार आहेत. सुमारे 12 लाख रोजगाराच्या संधी यातून निर्माण होणार आहेत.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये (Vadhavan Port)
- 76, 200 कोटी रुपये मूल्याचे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट वाढवण बंदर हे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जे.एन.पी.टी.) व महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त भागिदारीतून होणार आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा अनुक्रमे 74 व 26 टक्के आहे.
- या प्रकल्पांतर्गत बंदर आणि राष्ट्रीय महामार्गांदरम्यान रस्ता कनेक्टिव्हिटीची स्थापना आणि विद्यमान रेल्वे नेटवर्कशी जोडणी केली जाईल. यासोबतच, रेल्वे मंत्रालयाद्वारे आगामी समर्पित रेल्वे फ्रेट कॉरिडॉरही विकसित केला जाईल. या प्रकल्पाच्या खर्चात भूसंपादन घटकाचा समावेश आहे.
- या प्रकल्पामुळे भारताचा जागतिक एकि्सम व्यापार प्रवाह सुधारेल. आयएमईईसी (India Middle East Europe Economic Corridor) आणि आयएनएसटीसी (International North South Transportation Corridor) द्वारे या बंदराची क्षमता वाढ, आंतरराष्ट्रीय व्यापाराला (International Trade) भक्कम पाठबळ देणारा ठरेल.
- या बंदरात 1,000 मीटर लांबीचे नऊ कंटेनर टर्मिनल्स, चार लिक्विड कार्गो बर्थ, एक रो-रो बर्थ, एक तटरक्षक धक्का आणि चार बहुउद्देशीय धक्के यांचा समावेश आहे. यासोबतच, 1,448 हेक्टर क्षेत्राचे पुनर्वसन, 10.14 किमी ऑफशोअर ब्रेकवॉटर आणि कंटेनर/कार्गोद स्टोरेज क्षेत्रांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
- हा बंदर (Vadhavan Port) प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) ला प्रोत्साहन देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल आणि सुदूर पूर्व, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि अमेरिकासारख्या देशांमध्ये जलमार्गाने जाणाऱ्या मोठ्या जहाजांना हाताळण्यास सक्षम असेल.
- वाढवण बंदर (Vadhavan Port) पूर्ण झाल्यानंतर जगातील पहिल्या दहा बंदरांपैकी एक म्हणून ओळखले जाईल, ज्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार क्षमतेला एक नवा आयाम मिळेल.
हा प्रकल्प (Vadhavan Port) पीएम गतीशक्ती कार्यक्रमाच्या उद्दिष्टांशी अनुरूप आहे. या प्रकल्पामुळे जागतिक EXIM व्यापाराला (EXIM Trade) चालना मिळणार असून, सुमारे दहा लाख व्यक्तींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूत आधार मिळेल.