Vegetable Gardening: असे करा परसबागेचे व्यवस्थापन! जाणून घ्या ‘गंगा माँ मॉडेल’!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शहरी तसेच ग्रामीण भागातही परसबागेचे (Vegetable Gardening) आकर्षण नेहमीच आहे. स्वतः पिकवलेला भाजीपाला खाण्यात काही वेगळीच मजा असते, आणि त्याला चवही चांगली असते.

आपल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या उपलब्ध जागेत परसबाग (Vegetable Garden At Home) करण्याचे बहुतेक जणांचे स्वप्न असते. या परसबागेची आखणी कशी करायची आणि परसबागेचे गंगा माँ मॉडेल (Ganga Maa Model) याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या (Vegetable Gardening).  

परसबागेसाठी महत्त्वाच्या बाबी (Vegetable Gardening)

  • परसबागेसाठी निवडण्यात येणार्‍या जागेत भरपूर सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा उपलब्ध असावी.
  • परसबागेसाठी जागेची निवड करताना जमिनीची सुपीकता, संरचना व पाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
  • पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यास वर्षभर भाजीपाला पिके घेता येतात. दिवसाच्या जास्तीत जास्त काळात फळझाडे व भाज्यांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो. मात्र काही पालेभाज्या कमी सूर्यप्रकाशात अथवा सावलीतही घेता येतात.
  • बराच काळपर्यंत पावसाचे पाणी किंवा दव पडल्याने झाडांची पाने ओली राहिल्यास पानांना रोगांची लागण होते. म्हणून बागेत खेळती हवा असावी. 
  • थंडीची लाट व गरम हवेच्या झळांपासून बागेतील झाडांचे संरक्षण करण्याची आवश्यकता असते. चोर, शेळ्या आणि मोकाट जनावरांपासून बागेतील झाडाचे संरक्षण करण्यासाठी मजबूत कुंपण किंवा गडगा असावा.

जागेची निवड (Land Selection For Vegetable Gardening)

  • परसबागेसाठी (Vegetable Gardening) जमीन भारी किंवा कमी निचऱ्याची असल्यास त्या जमिनीत नदीतील गाळ, वाळू आणि सेंद्रिय पदार्थ घालून जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा निचरा करावा.
  • परसबागेची जमीन खळग्याची चुनखडीयुक्त नसावी. परसबागेसाठी जागेचा आकार जसा असेल तसा तो स्वीकारावा लागतो; परंतु शक्यतो ही जागा आकाराने चौकोनी असावी,
  • जागेच्या कोप-यात सावलीत कंपोस्ट खताचे एक किंवा दोन गाडे ठेवावेत आणि त्यामध्ये चारातील पालापाचोळा, परातीलच आणि पिकांचे अवशेष टाकावेत.

परसबागेची आखणी

  • परसबागेची जागा भरपूर मोठी असल्यास बागेच्या उत्तरेकडील बाजूला पपई, केळी, कागदी लिंबू, कढीलिंब, शेवगा, पेरू, द्राक्षे, नारळ, चिकू, संत्री आणि मोसंबी यांसारखी उंच फळझाडे लावावीत. यामुळे झाडांची सावली भाजी-पि‍कावर पडणार नाही.
  • परसबागेतील उपलब्ध जागेचा पूर्णपणे लाभ घेण्यासाठी वेलवर्गीय भाज्या (उदाहरणार्थ, वाल, काकडी) कुंपणावर, भिंतीवर किंवा गच्चीच्या कठड्यावर वाढवाव्यात.
  • लहान अथवा मध्यम आकाराच्या परसबागेत बटाटे, रताळी, सुरण, जास्त काळ जमिनीत वाढणारी पिके घेऊ नयेत.
  • पालक, आंबट चुका, चाकवत, अंबाडी, लेट्यूस, मेथी, कोथिंबीर, चवळाई, पुदिना, मुळा, गाजर व पातीसाठी कांदे या भाज्या बाजारातून विकत आणल्या तर लवकर सुकतात. म्हणून ताज्या भाज्या मिळण्यासाठी लहान परसबागेत कमी कालावधीच्या पालेभाज्यांना प्राधान्य द्यावे.

परसबागेचे व्यवस्थापन (Vegetable Garden Management)

पक्व भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. याशिवाय त्या आकर्षक दिसतात आणि त्यांची चव आणि स्वाद उत्तम असतो.

मुळावर्गीय भाज्या कोवळ्या असताना वाढाव्यात. त्या लवकर जाड बनतात.

टोमॅटो, खरबूज, कलिंगड, कोहळे या फळभाज्या पाहिजे तसे काढाव्यात. इतर पालेभाज्या कोवळ्या असताना काढाव्या.

पालेभाज्यांना फुले लागण्यापूर्वी त्यांची पाने खुडावीत, त्यामुळे अधिक पाने मिळतात.

मिरची, कांदा, अपक्व किंवा पक्व स्थितीत काढून वापरता येते.

थोडक्यात योग्य काळजी घेतल्यास कमी खर्चात आपणाला ताज्या, स्वादिष्ट, सकस व चवदार भाज्या दररोज मिळवता येतात.

परसबागेचे गंगा माँ मॉडेल (Vegetable Garden Ganga Maa Model)

प्रामुख्याने आदिवासी भागात हा मॉडेल परसबागेसाठी तयार करून त्याद्वारे आदिवासी महिला त्यांच्या अन्नद्रव्याच्या पोषणाची गरज भागवतात. या मॉडेल मध्ये 65 पेक्षा जास्त भाज्यांचे उत्पादन घेता येते. दर दिवशी सहा ते सात प्राकाराच्या भाज्या मिळू शकतात. या मॉडेलसाठी साधारण 750 स्क्वेअर फुट म्हणजे जवळपास 1 गुंठा जागा लागते. एक महिला या मॉडेल मधून वर्षाकाठी 50 हजार रुपये कमवू शकते. झारखंडमधील कृषी विद्यापीठाने हा मॉडेल जास्तीत जास्त राबवला आहे.

गंगा माँ मॉडेल बद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ बघा

https://www.youtube.com/watch?v=IUHubULuzSI