विहीर चोरीला गेली! औरंगाबादेत शेतकऱ्याची तक्रार, पहा काय आहे प्रकरण?

vohir
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :औरंगाबादच्या अजिंठ्यात प्रशासनाने केलेल्या चुकीमुळे एका शेतकऱ्याचा विहरीचा प्रस्ताव वारंवार नामंजूर होत होता मग यावर पर्याय म्हणून या शेतकऱ्यांना एक नामी शक्कल लढवली आणि बघता बघता ही शक्कल कामी आली आणि शेतकऱ्याचे काम देखील झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा मधल्या अनाड गावच्या शेतकरी भाऊराव गदाई यांनी चक्क पोलिसात विहीर हरवल्याची तक्रार दिली आहे. तलाठ्यांनी स्वतः शेतात विहीर असल्याची नोंद सातबारावर केली मात्र आता माझी विहीर हरवली आहे. अशी तक्रार त्यांनी पोलिसात दिली. आता अशा तक्रारीमुळे सगळेच बुचकळ्यात पडले. मग मात्र तपासाअंती खरा प्रकार लक्षात आला

गदाई यांच्या शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी विहीर खोदण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी अनेकदा अर्ज केले पण त्यांचा अर्ज वारंवार नाकारला जात होता. यांच्या शेतात एक बोरवेल आहे पण त्याच्या सातबार्‍यावर विहीर असल्याची नोंद तलाठ्यांना केली होती. त्यामुळे त्यांच्या विहिरीचा अर्ज नामंजूर होत होता. ही नोंद दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अनेकदा विनंती अर्ज केले पण त्याचा फायदा झाला नाही आणि हा मार्ग अवलंबला आणि त्यांना यशही आलं.

आता या प्रकारानंतर त्यालाच आणि शेतकर्‍यांच्या सातबारावर तांत्रिक अडचणीमुळे चुकून विहीर असल्याची नोंद झाल्याचे स्पष्ट केले. ही चूक दुरुस्त करण्यासाठी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून दोन दिवसात यावर कारवाई होईल असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे गदाई यांची ही शक्कल चांगलीच कामी आली आहे आणि याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.