बीजप्रक्रिया भाग -2 : जाणून घ्या ; बीजप्रक्रियेच्या सोप्या पद्धती आणि कृती

Seed processing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो ‘हॅलो कृषी’ च्या माध्यमातून बीजप्रक्रिया, बिजप्रेक्रियेचे फायदे कोणते आहेत ? याबाबत आपण बीजप्रक्रिया भाग -१ या लेखात माहिती घेतली आजच्या लेखात आपण बीजप्रक्रिया करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत ? बीजप्रक्रीयेची कृती काय आहे ? याबाबत माहिती घेऊया..

बीजप्रक्रिया करण्याच्या पद्धती :

१) मिठाच्या द्रावणाचा उपयोग-

पाण्याचा वापर करुन मिठाचे २ टक्क्याचे द्रावण तयार करुन घ्यावे. त्यासाठी २० ग्रॅम मीठ १ लीटर पाण्यात पुर्णपणे विरघळून घ्यावे. पेरणीसाठी वापरण्यात येणार्‍या बियाण्याच्या प्रमाणानुसार मीठ आणि पाणी यांचे प्रमाण कमी अधिक करावे. शेतकरी मित्रांनो, या द्रवणात पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे पुर्णपणे बुडऊन ढवळून घ्यावे हलके आणि रोगयूक्त बियाणे पाण्यावरती तरंगु लागतात. ते बियाणे चाळणीने वेगळे करुन काढून टाकावेत, आणि तळाशी असलेल्या बियाण्याचा वापर पेरणीसाठी करावा.

२) बुरशीनाशकांचा उपयोग-

पेरणीच्या बियाण्यावरती प्रक्रिया करण्यासाठी ते पावडर (भुकटी) स्वरुपात बाजारात उपलब्ध आहेत. प्रक्रियेसाठी बियाण्यावरती पातळ थर तयार होईल अशा पद्धतीने प्रक्रिया करवी.
बुरशीनाशकांच्या कार्यानुसार त्यांचे दोन गटात वर्गीकरण केले जाते :
अ) यात पहिले रोगनाशक रसायन किंवा बुरशीनाशक याचा समावेश होतो : हे रसायन बीजप्रक्रियेनंतर रोगकारक बुरशीचा नाश करतात आणि बियाण्याचे बुरशी पासून रक्षण करतात. परंतु हे रसायन बीज जमिनीत पेरल्यानंतर अधिक काळापर्यंत सक्रिय राहत नाही.
ब) दुसरा प्रकार आहे रोगरक्षक रसायन किंवा बुरशीनाशक : या प्रकारातील रसायने बियाण्याच्या पृष्टभागाला चिकटून राहतात तसेच बीज उगवणींनंतर काही ठराविक काळापर्यंत पिकाचे रक्षण करतात.

बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करण्याची पध्दती या विषयी आपण सविस्तर माहिती घेऊ:-

१) कोरडी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया –
या प्रक्रियेमध्ये रासायनिक बुरशीनाशक पावडरचा उपयोग केला जातो. या प्रक्रियेमध्ये अग्रोसेन जी.एन, सेरेसन, विटावॅक्स, कॅापर सल्फेट, थायरम, बाविस्टिन इत्यादि ची २ ते २.५ ग्रॅम प्रति किलो. बियाणे या दराने वापर करावा.
या मध्ये पुढील पध्दती आहे…

२) किडनाशकाचा उपयोग –

मातीमध्ये सुक्ष्मजीव तसेच नेक पिकास अपायकरक असणारे कीटक आढळून येतात. त्यांच्या नियंत्रणासाठी क्लोरोपाईरीफॅास २० ई.सी. किंवा पीकनिहाय वेगवेगळे कीटकनाशक पाण्यामध्ये मिसळून त्याचे द्रावण तयार करून बियाण्यावर शिंपडून घ्यावे आणि सुकवून बियाण्याचा पेरणीसाठी वापर करावा.
जिवाणूखतांची बीजप्रक्रिया करण्याची पध्दती या विषयी माहिती घेऊयात : अनेक प्रकारच्या जिवाणू खतांचा वापर करून जमिनीतील पोषक घटकांच्या उपलब्धतेमद्धे वाढ करण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे पुढील प्रकारचे जीवाणू खते वापरली जातात. जिवाणूखतांची बीजप्रक्रिया या मध्ये पहिला जीवाणू आहे…

१) राइझोबियम जीवाणू –

हे जिवाणू द्विदल पिकांच्या मुळांवरील गाठीत राहून सहजीव पद्धतीने नत्र स्थिर करण्याचे काम करतात. जीवाणू झाडातील अन्नरस मिळवतात आणि त्या बदल्यात झाडांना नत्राचा पुरवठा कारतात. राइझोबियम जीवाणू साधारणपणे १०० ते २०० किलोग्रॅम प्रती हेक्टर नत्र स्थिर करू शकतात. जिवाणूखतांची बीजप्रक्रिया या मध्ये दुसरा जीवाणू आहे…

२) अँझोटोबँक्टर जिवाणू –

हे जिवाणू एकदल पिकांच्या मुळांवर राहून अन्न मिळवतात, तसेच २० ते ३० किलोग्राम प्रती हेक्टर नत्र स्थिर कारतात. जिवाणूखतांची बीजप्रक्रिया या मध्ये तिसरा जीवाणू आहे…

३) पी. एस. बी. जिवाणू –

हे जिवाणू मातीमधील न विरघळणार्‍या, स्थिर तसेच उपलब्ध न होणार्‍या फॉस्फरस चे विघटन करून तो पिकास उपलब्ध करतात. उपयोग मात्रा २५० ग्रॅम पाकीट प्रती १० किलो बियाण्यासाठी प्रती जिवाणू संवर्धकसाठी.

जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करण्याची कृती –

जिवाणूखतांच्या प्रक्रियेचा फायदा होण्यासाठी योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक बीजप्रक्रिया करणे फायद्याचे ठरते. २५० ग्रॅम जिवाणू खत १०% गुळाच्या द्रावणात (१० %= १ लीटर पाण्यात १०० ग्रॅम गूळ विरघळून तयार होणारे द्रावन; गरजेनुसार प्रमाण कमी आधिक करावे) मिसळून प्रति १० किलो बियाण्यास प्रक्रिया करून सावलीत सुकवून द्यावे, आणि २४ तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे.

बिजप्रक्रिया क्रम : बुरशिनाशक , कीटकनाशक व जीवणुसंवर्धक

अशाप्रकारे कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला बीजप्रक्रिया पध्दतीचा वापर करता येईल. या पध्दतीचा अवलंब केल्याने रोगनियंत्रणाचा खर्च कमी होऊन रसायनांच्या अयोग्य वापरामुळे होणारी निसर्गाची हानीही टाळता येईल. आपण आज घेतलेल्या माहितीचा अवलंब करून, आपण आपल्या शेतीत भरगोस असे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा.