हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हंगामामध्ये कोणत्या पिकाला सर्वाधिक चांगला दर मिळाला असेल तर ते पीक म्हणजे कापूस होय. कापसाच्या दरातील तेजी ही अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मुळातच कापसाची कमी अवक हे कापसाच्या दरवाढीचे कारण आहे. कापसाला अद्यापही मागणी जास्त आहे. मात्र मागणीच्या तुलनेत कापसाची आवक मात्र कमी होत आहे. आगामी खरीप हंगामात सुद्धा कापूस लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेला राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाला कमाल भाव 13 हजार 975 रुपये इतका मिळाला आहे. हंगामातील हा सर्वाधिक कापुस बाजार भाव आहे. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातशे पन्नास क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली. याकरिता किमान भाव 900 रुपये, कमाल भाव 13 हजार 975 आणि सर्वसाधारण भाव दहा हजार 395 इतका मिळाला.
यापूर्वी गुरुवारी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 13 हजार 700 रुपयांचा कमाल भाव मिळाला होता. आज 275 रुपयांनी भाव वाढले आणि हा भाव 13 हजार 975 वर जाऊन पोहोचला आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही समाधानकारक बाब आहे. मात्र सगळ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे असे नाही. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाचे दर १० हजार रुपये झाल्यानंतर कापूस विक्रीस काढला होता. शिवाय अतिवृष्टीआणि बोंड अळीमुळे कापसाचं उत्पादनचं कमी झाले.
(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )
आजचे 13-5-22 कापूस बाजारभाव
APMC | Variety | Unit | Quantity | Lrate | Hrate | Modal |
---|---|---|---|---|---|---|
13/05/2022 | ||||||
SAVNER | —- | QUINTAL | 1400 | 11000 | 11800 | 11350 |
HINGANGHAT | MEDIUM STAPLE | QUINTAL | 750 | 9000 | 13975 | 10395 |
12/05/2022 | ||||||
SAVNER | —- | QUINTAL | 1400 | 11000 | 11600 | 11250 |
GHANSAWANGI | —- | QUINTAL | 50 | 9000 | 10500 | 9500 |
HINGANGHAT | MEDIUM STAPLE | QUINTAL | 462 | 9000 | 13700 | 10290 |
11/05/2022 | ||||||
SAMUDRAPUR | —- | QUINTAL | 32 | 9000 | 12400 | 9900 |
GHANSAWANGI | —- | QUINTAL | 50 | 900 | 10500 | 9500 |
ARVI | H-4 – MEDIUM STAPLE | QUINTAL | 120 | 10000 | 12700 | 11000 |
JAMNER | HYBRID | QUINTAL | 18 | 10500 | 11300 | 10950 |
SINDI (SELU) | LONG STAPLE | QUINTAL | 537 | 9500 | 13595 | 12500 |
HINGANGHAT | MEDIUM STAPLE | QUINTAL | 570 | 9000 | 13475 | 11040 |
WARDHA | MEDIUM STAPLE | QUINTAL | 40 | 8500 | 12750 | 10200 |