मान्सूनची प्रतीक्षा ! खरीप हंगामात 14 लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

Farmer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या आगामी खरिपाची तयारी सुरु करीत आहेत. काही ठिकाणी रोपवाटिकांचे काम सुरु करण्यात आले आहे. पुणे महसूल विभागात पूर्व मशागतीची काही कामे सुरु झाली आहेत. वेळेत पाऊस झाल्यास १३ लाख ८९ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. त्यानुसार कृषी विभागाने खते, बियाण्यांचे नियोजन करण्यास सुरूवात केली आहे.

पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात खरिपाचे सरासरी १३ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्षात १३ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. निविष्ठा पुरवठ्याचे नियोजन कृषी विभागामार्फत सुरू झाले आहे. पश्चिम पट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहील. त्यासाठी आत्मा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठी लागणाऱ्या रोपवाटिकांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन भात रोपवाटिकेची कामे सुरू करावीत. काही ठिकाणी भात बियाण्यांची तजवीज करण्यास सुरूवात झाली आहे.

सध्या विभागातील बहुतांशी भागात उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिके घेतलेली नाहीत, अशा शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पूर्व मशागतीवर शेतकरी भर देऊ लागले आहेत. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात प्रामुख्याने भात पिकांची लागवड केली जाते. तर सोलापूर व सातारा, पुणे, सांगलीच्या पूर्व भागात सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पिके शेतकरी घेतात.

खरिपात पेरणी होणारे अंदाजित क्षेत्र (हेक्टर)

घटक…अंदाजित पेरणी (लाख हेक्टर)

खरीप तृणधान्ये…६.४५

खरीप कडधान्ये…३.०२

खरीप गळीत धान्ये…४.४२