महत्वाची बातमी ! आता घरबसल्या भरता येणार शेतीसंबंधीचे विविध कर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आता शेतीवरील विविध कर भरण्यासाठी तलाठ्याकडे फेऱ्या मारण्याची गरज नाही तुम्ही स्वतः ऑनलाईन पद्धतीने तुमच्या शेती संदर्भातले कर भरू शकता भूमी अभिलेख विभागाने तयार केलेल्या ई पीक पाहणी ॲपवर नोंदणी केलेल्या पिकाच्या क्षेत्रानुसार करविषयक ऑनलाइन माहिती घेऊन कोणत्याही यूपीआयच्या माध्यमातून हा कर आता घरबसल्या भरता येणार आहे.

राज्यातल्या जवळपास 356 तालुक्यातील प्रत्येकी एका गावात याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. लवकरच संपूर्ण राज्यात ही योजना लागू केली जाणार आहे. राज्यात गेल्या वर्षी ई पीक पाहणी ॲप मधून पिकांची नोंदणी करण्यास सुरुवात झाली त्याला तीन महिने अर्थात एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षाच्या काळात भूमी अभिलेख विभागाला ईपीक पाहणीत अनेक नवीन बाबी समाविष्ट करण्याची संधी मिळाली. त्यानुसार ह्या ॲप मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आलेत. त्याचे अनावरण एक ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक निरंजन कुमार सुधांशू यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, ई – पिक पाहणी ॲप मध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्या असून पीक नोंदणी केल्यानंतर सुमारे 90% पीक नोंदणी स्वयं मान्य होणार आहे केवळ दहा टक्के पीक नोंदणीचे तलाठ्याकडून पडताळणी केली जाणार आहे. पीक नोंदणी करताना त्या पिकाचा फोटो ॲप मध्ये डाऊनलोड करावा लागणार आहे. हा फोटो ठराविक अंतरावरूनच घ्यावा लागणार आहे. तो दूर अंतरावरून घेतल्यास तशी सूचना लागलीच sms च्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळेल. तरी देखील शेतकऱ्यांना त्या दुरुस्ती न केल्यास त्याची नोंद मुख्य सर्व्हर वर होणार आहे. शिवाय कृषी विषयक योजनांचा लाभ, कर्ज प्रकरण किंवा नुकसान भरपाईचा लाभ घेण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याने चुकीची माहिती दिल्यास त्याचीही नोंद सर्वर वर केली जाणार आहे. अशा प्रकरणांची पडताळणी तलाठ्या मार्फत केली जाणार आहे त्यामुळे चुकीच्या कामांना आळा बसेल व पीक नोंदणीची माहिती अचूक मिळून राज्य सरकारला त्याच्या नियोजनासाठी फायदा होणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

काय होईल फायदा

-नवीन ॲपला ई चावडी हा प्रकल्प जोडण्यात आला असून शेत सारा व संबंधित महसूल गोळा करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

-ॲप वर नोंदणी केलेल्या पिकामुळे आपल्या शेती क्षेत्रावर किती कर आहे याची माहिती हातातच उपलब्ध होणार आहे त्यामुळे तलाठ्याकडे खेटे मारावे लागणार नाहीत.

-शेतकऱ्याला जमिनीवरील शेतसारा शिक्षण उपकर जिल्हा परिषद उपकर रोजगार हमी उपकर अधिकारांचा व जमीन महसूल भरणा घरबसल्या करता येणार आहे.

-राज्य सरकारला ही एका क्लिकवर राज्यात नेमका किती कर सेस गोळा होणार आहे याचा अंदाज त्यामुळे येणाऱ्या याचा फायदा नियोजनासाठी होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!