तुरीच्या लागवडीत घट; दर मात्र आणखी वाढण्याची शक्यता

Tur Market
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आता हंगामाच्या शेवटी तुरीच्या मागणीत मोठी वाढ झाल्यामुळे तुरीचे दर वाढले आहेत. नैसर्गिक आपत्ती मुळे मागील वर्षी देखील तूर उत्पादकांना देखी मोठा फटका बसला होता. त्यामुळे तुरीच्या लागवडीत घट झाल्याचे दिसून येत आहे. तुरीची लागवड गेल्या वर्षीपेक्षा ११.६७ टक्क्यांनी घटलीये. म्हणजेच मागील आठवडाभरात तूर लागवड १.२४ टक्क्यांनी कमी झाली. तर आजपर्यंत गेल्यावर्षीपेक्षा ५ लाख ५५ हजार हेक्टरनं क्षेत्र घटलं. यात कर्नाटकातील तूर लागवड ८२ हजार हेक्टरनं कमी झाली. त्यामुळे याचा परिणाम अर्थातच उत्पादनावर होणार आहे.त्यामुळे तुरीच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

तुरीच्या लागवडीत घट

देशात तुरीच्या दरात आणखी सुधारणा होण्यासाठी परिस्थिती निर्माण होतेय. ५ ऑगस्टपर्यंत देशातील तूर लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत १०.४२ टक्क्यांनी कमी होती. मात्र आजच्या अहवालात तुरीची लागवड गेल्या वर्षीपेक्षा ११.६७ टक्क्यांनी घटलीये. म्हणजेच मागील आठवडाभरात तूर लागवड १.२४ टक्क्यांनी कमी झाली. तर आजपर्यंत गेल्यावर्षीपेक्षा ५ लाख ५५ हजार हेक्टरनं क्षेत्र घटलं. यात कर्नाटकातील तूर लागवड ८२ हजार हेक्टरनं कमी झाली.

तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता

कर्नाटक हे देशातील महत्वाचं तूर उत्पादक राज्य आहे. तर महाराष्ट्रीतही तुरीखालील क्षेत्र यंदा १ लाख ४० हजार हेक्टरनं कमी झालंय. तसंच तेलंगणातही १ लाख ३० हजार हेक्टरनं तूर लागवड कमी झालीय. एकीकडं तुरीच्या दरात तेजी असतानाही लागवड घटतेय. आधीच कमी लागवड आणि पावसानं होत असलेल्या नुकसानीमुळं तुरीच्या दरात तेजी आलीय. सध्या देशात तुरीला ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपयांचा दर मिळतोय. आज तूर लागवड आणखी कमी झाल्याचा अहवाल आलाय. त्यामुळे पुढील काळात तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होतेय. देशात या महिन्याच्या शेवटी आफ्रिकेतून तूर आयात होईल. मात्र देशातील परिस्थिती पाहता ही तूर महाग विकली जाईल. तसंच बर्मा या देशातील निर्यातदारही तुरीचे दर वाढवतील. एकूणच काय तर भविष्यात तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तुरीच्या दरात आणखी २०० ते ३०० रुपयांची सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

संदर्भ – ऍग्रो वन