Weed Control : असे करा कापूस आणि सोयाबीन पिकांतील तणनियंत्रण

Weed Control
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात वातावरण पोषक असल्यामुळे तणांचा (Weed Control) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. अशावेळी वेळीच तणांचा नायनाट केला नाही तर मुख्य पिकांची वाढ नीट होत नाही. अशावेळी एकाच तण नियंत्रण पद्धतीवर अवलंबून न राहता एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये शेतामध्ये पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे. शेतातील पाणी पाट, बांध, कंपोस्ट खड्डे या जवळ तणे उगवू देऊ नयेत. उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावीत. त्यामुळे तणांचा प्रसार रोखला जातो.

निवारणात्मक उपाय

मशागतीय पद्धत : नांगरट, आंतरमशागत योग्य प्रकारे करणे आवश्यक.

कायिक/ यांत्रिक पद्धत : मानवी, पशुधन किंवा यांत्रिक शक्तीच्या वापरातून तणे शेतातून काढली जातात. उदा. खुरपणी, कोळपणी, खांदणी, तण उपटणे, छाटणे किंवा जाळणे इ.

जैविक पद्धती : कीटक, जिवाणू, बुरशी, वनस्पती यांचा वापर करूनही तण नियंत्रण करता येते. उदा. गाजर गवताचे नियंत्रणासाठी ‘मेक्सिकन भुंगे’ वापरता येतात. किंवा तरोटा, स्टायलो हेमाटा इ. गवते वाढवून अनावश्यक तणांच्या वाढीवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण ठेवता येते.

रासायनिक पद्धत : रासायनिक पद्धतीमध्ये निवडक आणि बिननिवडक तणनाशकांचा (Weed Control) शिफारशीप्रमाणे वापर केला जातो. योग्य तणनाशकांच्या वापरामुळे तणांचे प्रभावी नियंत्रण करता येते.

१) कापूस

(प्रमुख तणे : सावा घास, भगर, कुंद्रा, माका, केना, धोत्रा, हराळी, गोखरू, तांदूळकुंद्रा, आघाडा, चिलघोळ, लोणी गवत इ.)

क्विझालोफॉप इथाईल (५ % ई.सी.) १००० मि.लि. प्रति ५०० लिटर पाणी – पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी.

पॅराक्वाट डायक्लोराइड (२४ % एस.एल.) १२५० ते २००० मि.लि. प्रति ५०० लिटर पाणी किंवा ५०० ते ८०० मि.लि. प्रति एकर

हे बिननिवडक व स्पर्शजन्य तणनाशक तणे उगवल्यानंतर दोन ओळींमध्ये तणे २ ते ३ पानांच्या अवस्थेत वापरावे.

फिनोक्साप्रॉप पी इथाईल (९.३ % ईसी) ७५० मि.लि. प्रति ३७५ ते ५०० लिटर पाणी.

२) सोयाबीन

(प्रमुख तणे : लव्हाळा, केना, क्रब ग्रास, राळा, चिमणचारा, वाघनखी इ.)

बेंटॅझोन (४८० ग्रॅम / लि.) २००० मि.लि. प्रति ५०० लिटर पाणी किंवा १०० मि.लि. प्रति एकर – तणे २ ते ३ पानांवर असताना फवारणी करावी.

क्लोरीम्यूरॉन इथाईल (२५ % डब्ल्यू.पी.) ३६ ग्रॅम प्रति ३०० लिटर पाणी अधिक सर्फेक्टंट किंवा १४ ग्रॅम प्रति एकर अधिक सर्फेक्टंट – पेरणीनंतर ३ ते १५ दिवसांनी फवारणी (Weed Control) करावी.

फिनोक्साप्रॉप पी इथाईल (९.३ % ई.सी.) १११ मि.लि. प्रति २५० ते ३०० लिटर पाणी किंवा ४४४ मि.लि. प्रति एकर – पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी फवारणी.

इमॅजीथाइपर (१० % एस.एल.) १ लिटर प्रति ५०० ते ६०० लिटर पाणी किंवा ४०० मि.लि. प्रति एकर – तणे २ ते ३ पानांच्या अवस्थेत असताना फवारणी करावी.