Kisan Long March : पायी चालताना अस्वस्थ वाटू लागले, शेतकऱ्याच्या मृत्यूने वातावरण तापले; सरकारला जाग कधी येणार?

Kisan Long March
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकऱ्याचा पायी मोर्चा (Kisan Long March) नाशिक वरून मुंबईच्या दिशेने निघाला आहे. १२ मार्च रोजी सुरु झालेल्या या पायी मार्चमध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले असून किसान सभा या मोर्चाचे प्रतिनिधित्व करत आहे. अशात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पायी चालताना अस्वस्थ वाटू लागल्याने एका शेतकऱ्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मृत्यूने वातावरण तापले असून सरकारला जाग कधी येणार असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.

नाशिकहून मुंबईच्या दिशेने पायी चालताना पुंडलिक अंबादास जाधव (Pundalik Jadhav) या शेतकऱ्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. यानंतर पुंडलिक यांना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पुंडलिक यांचा मृत्यू झाला. जाधव यांच्या मृत्यूने वातावरण तापले असून शेतकऱ्याच्या प्रश्नांवर सरकार कधी गांभीर्याने विचार करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मृत्यू पावलेल्या पुंडलिक यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले असून लॉंग मार्चला सर्व स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे.