Weather Update : पुढचे काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस; हवामान विभागाने दिला अलर्ट

Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : गेल्या महिन्यात राज्यातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भगात पावसाने थैमान घातलं होतं. काही ग्रामीण भागात गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, शेतीसाठी गुंतवलेल्या पैशांची नासाडी झाली. अशाच पद्धतीच्या वातावरणामुळे आज विदर्भातील पूर्व भागात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर इतर भागात तापमान अधिक असणार असल्याची शक्यता हवामान खात्याने (weather Department) वर्तवली आहे.

हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ भागासाठी अलर्ट जारी केला आहे. आज विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ६,७,८ एप्रिल रोजी मराठवाडा व विदर्भात मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना आज उद्या पर्यंत आपली काढणी करून घेण्याची सूचना हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी केली आहे.

काल (ता.३) चंद्रपूरमध्ये ३८ अंश सेल्सिअस तापमान होते. त्याचप्रमाणे सोलापूर आणि अकोला येथे देखील ३८° सेल्सिअस तापमान अनुभवायला मिळत होते. दररोज राज्यातील तापमानात बदल होतच आहे. तसेच इतर जिल्ह्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. Weather Update

असा मिळवा तुमच्या गावातील अचूक हवामान अंदाज

दररोज बदलत असलेल्या तापमानाची माहिती मिळवायची असेल तर Hello Krushi ॲपचा वापर करून तापमान तपासू शकता. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा. नाव,प्राथमिक माहिती टाकून निःशुल्क रजिस्ट्रेशन करा. या ॲपद्वारे आपण राहत असलेल्या विभागाच्या तापमानाची माहिती एका क्लिकवर घरबसल्या समजते. त्याचप्रमाणे जमीन मोजणी, कागदपत्रे, बाजारभाव, सरकारी योजना, जनावरे खरेदी विक्री, सातबारा डाऊनलोड या सेवा Hello Krushi ॲपवर मोफत दिल्या जातात.

विदर्भाच्या पूर्व भागात होणार अवकाळी पाऊस? काय आहे नेमकं कारण

विदर्भ, मराठवाडा तसेच कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत ९०० मीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा त्याचप्रमाणे वाहणारे वारे खंडीत झाले. राजस्थानमधील काही भागात समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर अंतरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती पहायला मिळते. यामुळे राज्यात पावसाचं वातावरण तयार होतंय.