हॅलो कृषी ऑनलाईन (Strawberry Farming) : शेती व्यवसाय करणे म्हणजे एखाद्या लॉटरीच्या तिकिटा सारखा आहे. लागली तर स्वप्न पूर्ण होते नाहीतर हाती निराशा पडते. सोलापुरातील करमाळा तालुक्यातील वांगी नंबर ३ येथील शेतकऱ्याने ७ गुंठ्यांत स्ट्रॉबेरीचं (Strowberry) पीक घेऊन लाखोच्या (Laksh Rupees Income) घरात उत्पन्न केलं आहे. यामुळे आता अनेक लोकं ही लॉटरीची स्ट्रॉबेरी पाहण्यासाठी सोलापुरात येत आहेत.
करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या सानिध्यात वांगी नंबर ३ या गावात विकास वाघमोडे या शेतकऱ्याने कामाल केली आहे. उजनी धरणाच्या पाण्याचा वापर करत त्याने केवळ ७ गुंठ्यांत स्ट्रॉबेरीचे उत्पन्न काढलं आहे. एवढंच नाही तर यात एकूण पाच लाखांचा नफा झाला. सोलापूर हे स्ट्रॉबेरी या पिकासाठी ओळखले जात नाही. तरीही विकास वाघमोडे यांनी हा नवीन प्रयोग केला. त्या प्रयोगाला यश देखील मिळालं आहे.

सरकारी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
सात गुंठ्यांत हजारो स्ट्रॉबेरी रोपांची लागवड (Strawberry Farming)
स्ट्रॉबेरी या पिकाचे उत्पन्न मिळवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वाई, पाचगणी ही क्षेत्रे हवामानानुसार अधिकाधिक प्रसिद्ध आहेत. येथील हवामान स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यासाठी योग्य आहे. परंतु या नियमाला तोडत विकास वाघमोडेंनी उचललेलं पाऊल हे कौतुकास्पद आहे. याच सात एकरात त्यांनी स्ट्रॉबेरीच्या ४ हजार रोपांची लागवड केली. तसेच ५ लाखांचे उत्पन्न मिळवले. यासाठी विकास यांनी एक लाख १३ हजार एवढा खर्च केला.