हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : राज्यात अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाची (Unsesonal Rain) शक्यता पहायला मिळते. यामुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत. तर दुसऱ्या बाजूला उकाड्यातही बऱ्याच प्रमाणात इतर भागात ३७ अंश तापमानावर वाढ होताना दिसतेय. सोमवारी (ता.१०) या दिवशी चंद्रपूरमध्ये ३९.२ तापमान असून इतर भागात ३७ अंशापर्यंत तापमान होते. राज्यात आजही काही भागात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आज (ता.११) या दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३० ते ४० किमी ताशी वेगाने वारे वाहून मेघगर्जनांसह विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हा हवामान खात्याने ( Weather Department) दिला आहे. कमाल आणि किमान तापमानात ३ ते ५ अंशाच्या तापमानात वाढ झाली. दररोज तापमानात बदल होताना दिसतो. रोजच्या हवामानातील बदलाची माहिती मिळवण्यासाठी Hello Krushi या ॲपचा वापर करावा.
आपल्या गावातील हवामानाची माहिती मिळवण्यासाठी हे काम करा
शेतकरी मित्रांनो जर अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं नाव सर्च करा. नंतर ॲप इंस्टॉल करून ॲपमध्ये रोजच्या वातावरणाबद्दल अपडेट्स मिळवता येईल. यामुळे तुमचे शेतीतील नुकसान टाळता येऊ शकते.
नैऋूत्य मान्सून २०२३ कसा असेल देशात !!
IMD चे यंदाच्या पावसाचे पहील्या टप्प्याचे दिर्घकालीन पुर्वानुमान,
११ एप्रिल, दूपारी 12.30 वा.
🌧🌧🌧🌧
Long Range Forecast for SW Monsoon 2023 by IMD on 11 April, 12.30 noon. https://t.co/cY8Nu62yP7— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 10, 2023
महाराष्ट्रात दुपारनंतर अवकाळी पाऊस (weather Update)
राजस्थान परिसरातील इतर भागात ९०० मी. चक्राकार वारे पहायला मिळतात. महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण तयार करण्यासाठी पोषक होत आहे.